कोल्हापूर : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे उद्या गुरुवारी महालक्ष्मी आणि साईबाबाच्या दर्शनासाठी येणार आहेत. चंद्राबाबू नायडू हे भारतीय राजकारणातील महत्त्वाचे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले नायडू हे तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते हैदराबादहून बेळगाव विमानतळावरून कोल्हापूर येथे येतील. कोल्हापूरात ११.४५ ते १२.१५ यावेळी महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहेत.

त्यांचा दौरा लक्षात घेऊन खा साहेब पुतळा, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर , बिन खांबी गणेश मंदिर या मार्गावरील वाहतूक शिथिल केली असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले. दरम्यान, यानंतर ते कोल्हापूर विमानतळावरून शिर्डी येथे जाणार आहेत. तेथे दुपारी अडीच वाजता साईबाबाचे दर्शन घेऊन पुन्हा बेळगाव मार्गे हैदराबादला रवाना होणार आहे.

हेही वाचा : स्मार्ट मीटर्सचा स्मार्ट प्रोजेक्ट म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; प्रताप होगाडे यांचा आरोप

दरम्यान, चंद्राबाबू नायडू व भाजप यांनी संयुक्तपणे लोकसभा निवडणूक लढवली असली तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या दौऱ्याबद्दल विशेष माहिती नाही. उद्या त्यांच्या दौऱ्यात भाजप पदाधिकारी सहभागी होणार का , याकडे लक्ष लागले आहे.