कोल्हापूर : कोल्हापुरातील जरग नगरातील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिराचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस उंचावत चालला आहे . परिणामी या शाळेत पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच पालकांची रीघ लागले होती. दरवर्षी पहाटेपासून प्रवेशासाठी गर्दी असायची , पण यावर्षी ती सोमवारी सायंकाळपासूनच झाल्याचे आशादायक तितकेच अनोखे चित्र पाहायला मिळाले. शासकीय शाळा म्हटले की त्याकडे पालकांचा काणाडोळा होतो. तथापि श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर याला अपवाद आहे. महानगरपालिकेची ही शाळा असूनही या शाळेत मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी कित्येक पालक प्रयत्न करतात. दरवर्षी पहाटे चार वाजता येथे प्रवेशासाठी रांग लागलेली असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

सतत नवनवीन उपक्रम राबविणारी, कोल्हापूर जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात शिष्यवृत्ती परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याच नावाचा ‘जरगनगर पॅटर्न’ निर्माण करणारी शाळा असा जरग विद्यामंदिरचा नावलौकिक आहे. प्राथमिक शिक्षण समिती, कोल्हापूर महानगरपालिका यांनी कोल्हापुरात गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व मोफत शिक्षण मिळावे, या हेतूने अनेक शाळा स्थापन केल्या. त्यांपैकीच ही एक शाळा आहे. जरगनगर परिसरात एप्रिल १९९४ रोजी या शाळेची स्थापना झाली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur parents standing in long queue outside jarag nagar municipal corporation school css