कोल्हापूर : राधानगरी धरणात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. सतीश लक्ष्मण टिपूगङे ( वय ३५, रा. भैरीबांबर, सध्या कागल), आश्विनी राजेंद्र मालवेकर (वय ३२, रा. सावर्ङे कागल, सध्या तळंदगे, हातकणंगले) व प्रतीक्षा राजेंद्र मालवेकर (वय १३ ) अशी मृतांची नावे आहेत.

राधानगरी तालूक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या भटवाढी गावाच्या हद्दीत असणार्‍या बॅकवाॅटर परिसर पाहाण्यासाठी हे सर्वजण काल गेले होते. काहींनी जेवणासाठी भाकरी करण्यास सांगून पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. घरी न आल्याने सोबतच्या नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती.

हेही वाचा : “मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना आता…”; गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका!

आज त्यांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. ते शवविच्छेदनासाठी राधानगरी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत दाखल झाली असून तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खंडू गायकवाङ करत आहेत.