लॉकडाउनच्या काळात मुंबईतील सांताक्रुझ येथून बंद कंटेनरमधून कर्नाटकला निघालेल्या ३० नागरिकांना तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरात पकडण्यात आले. यातील एक जण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या प्रवाशांना कोल्हापूरच्या परिवहन सेवेतील बसमधून (केएमटी) रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, धक्कायदायक बाब म्हणजे या केएमटी चालकाची अद्याप तपासणी करण्यात आलेली नाही.
मुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथून बंद कंटेनरमधून हसन (कर्नाटक) येथे जात असताना ३० जणांना कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे पकडले होते. तसेच कोल्हापुरात थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली होती. यामधील एक जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही व्यक्ती मुंबईत सांताक्रुझ ईस्ट भागातील रहिवासी आहे.