कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने अखेर शिंदे गटात | Kolhapur MP Sanjay Mandlik Darishsheel Mane finally in Shinde group amy 95 | Loksatta

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने अखेर शिंदे गटात

आडून आडून शिंदे गटासोबत जाण्याचे संकेत देणारे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी उघडपणे एकनाथ शिंदे गटात गटासोबत राहिल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने अखेर शिंदे गटात
( कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने अखेर शिंदे गटात )

कोल्हापूर : आडून आडून शिंदे गटासोबत जाण्याचे संकेत देणारे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी उघडपणे एकनाथ शिंदे गटात गटासोबत राहिल्याचे स्पष्ट झाले. आज शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामध्ये कोल्हापुरातील या दोन्ही खासदारांचा समावेश होता.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. शिंदे यांच्या सोबत जिल्ह्यातील राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांची भूमिका तळ्यात होती. खासदार मंडलिक यांनी तर फुटीर शिवसैनिकांना उद्देशून ‘ गेले ते बेन्टेक्स राहिले ते सोने ‘ अशा शब्दात निशाणा साधला होता. धैर्यशील माने यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा असल्याचे स्पष्ट केले होते.

तथापि गेल्या दोन-तीन दिवसापासून दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. विकास कामांसाठी शिंदे यांच्यासोबत राहणे राजकीयदृष्ट्या फायदेशीर असल्याचे त्यांच्या विधानातून प्रतीत होत होते. आज शिवसेनेच्या बारा खासदारांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यामध्ये मंडलिक व माने या दोन्ही खासदारांचाही समावेश होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेला दुसरा जबर दणका बसला असून त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2022 at 19:41 IST
Next Story
आता फक्त मरण स्वस्त; राजू शेट्टींची जीएसटीवर टीका