कोल्हापूर : दुबई येथे मराठी भाषिकांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते. छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या सोहळ्यात कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याचे दमदार सादरीकरण केले. त्यावर ठेका धरत दुबई शिवप्रेमींनी सभागृह दणाणून सोडले.
शिवशाहीर सावंत यांनी या राजधानीवरती भगवे निशान आहे, एक धून सहा जून, शेतकरी गीत, गोंधळ, शिवचरित्रावरील पोवाडे जोशात सादर केले. त्यांना भगवान आंबले, मारूती रणदिवे यांची झिल व सुरसाथ लाभली. रत्नाकर कांबळे, सुदर्शन ढाले, अनिकेत ससाणे यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी छत्रपती ताराराणी यांच्या जीवनातील काही प्रसंग सादर केले.