कोल्हापूर : गणेशोत्सवात आठवडाभर पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हीच बिकट स्थिती उद्भवत आहे. कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सोमवारपासून तीन दिवस विस्कळीत होणार असल्याने सणासुदीच्या दिवसात नागरिकांना पाहण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे.

काळम्मावाडी योजनेचा चौथा पंप दुरुस्ती व नियमित देखभाल काम सोमवार व मंगळवारी हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये साळोखेनगर मुख्य वितरण नलिकेवरील व्हॉल्व बसवण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेवरील अवलंबून असणाऱ्या संपूर्ण कोल्हापूर शहर व संलग्नित उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच बुधवारी होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. त्याचप्रमाणे बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी, डी वॉर्ड व शिंगणापूर येथून कसबा बावडा फिल्टरकडून कसबा बावडा, ताराबाई पार्क व कावळा नाका परिसरातील नागरिकांचा पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर शहराचा संपूर्ण ए,बी वॉर्डातील पुईखडी, कलिकते नगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटीलनगर, जिवबा नाना, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्याणी कॉम्प्लेस, तपोवन, देवकर पाणंद, मोरे मानेनगर, संभाजीनगर स्टँड, नाळे कॉलनी, रामानंदनगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर.के.नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, पोतणीस बोळ, मंगेशकर नगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, तिकोणे गॅरेज, नेहरूनगर, वाय.पी.पोवार नगर, जवाहर नगर, संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, शाहुमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतिनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरूणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल, सम्राटनगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवशा मारूती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकरमाळ, साईक्स एक्सटेंशन व शाहुपूरी इत्यादी भागामध्ये होणारा दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याचे पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.