कोल्हापूर : राजीव गांधी जयंती आणि जिल्हा काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे अतूट समीकरणे बनले होते. त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व मागील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील आणि त्यांचे बंधू श्रीपतराव दादा बोंद्रे बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील यांचा पुढील आठवड्यात अजित दादा पवार काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असल्याने यावर्षी त्यांच्याकडून होणारी दौडचे आयोजन झाले नाही. मात्र त्याचे राजकीय पडसाद उमटू लागल्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसने या दौडची जबाबदारी घेतली. बुधवारी ही दौड राजर्षी शाहू महाराज स्मारक स्थळ ते राजीव गांधी पूर्णाकृती पुतळा या मार्गावर धावली. सद्भावना दौडची खांदेपालाट

जिल्हा काँग्रेसचे माजी दिवंगत अध्यक्ष पी.एन पाटील. यांच्याकडून ते विद्यमान अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडे झाल्याने त्याची राजकीय चर्चा होत आहे. आजच्या सद्भावना दौड मध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील, आनंद माने, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सरलाताई पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर संजय मोहिते आदी सहभागी झाले होते.

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने आज सदभावना दौड काढण्यात आली. या दौडच्या माध्यमातून स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दोडची राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात करण्यात आली. अमर रहे अमर रहे, राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देत कोल्हापुरात सद्भावना दौड झाली. दर वर्षी दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात येते होते.यंदा काँग्रेसच्या वतीने या दौंडचे आयोजन करण्यात आले होते.

सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर ,दाभोळकर कॉर्नर, वटेश्वर महादेव मंदिर आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ही सद्भावना दौड काढण्यात आली. ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राजीव गांधी यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन केले.

पी एन पाटील यांचे विचार हे काँग्रेसचे विचार आहेत आणि त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सद्भावना दौडचे आयोजन केले आहे. या सदभावना दौडच दरवर्षी आयोजन करण्यात येईल यामध्ये काँग्रेसच्या वतीन सातत्य राखण्यात येईल,असे ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.

या सद्भावना दौड मध्ये बबन रानगे, दत्ता वारके, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, विक्रम जरग, अर्जुन माने, राहुल माने, प्रविण केसरकर, ईश्वर परमार, रियाज सुभेदार, प्रताप जाधव सरकार, रवि आवळे, जय पटकारे, विनायक फाळके, फिरोज सौदागर धनंजय सावंत, सुभाष बुचडे, तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे, सुरेश ढोणुक्षे, शशिकांत पाटील, अमर समर्थ, दता बामणे, रमेश चावरे, अनुप पाटील, दिग्विजय मगदूम, सर्जेराव साळोखे, शिवानंद बनसोडे, भैया शेटके, काका पाटील, संजय पटकारे, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, महमद शरीफ शेख, अक्षय शेळके, दिपक थोरात, उमेश पाडळकर, संदीप सरनाईक, सुलोचना नायकवडी, वैशाली महाडीक, चंदा बेलेकर, उज्वला चौगले, पूजा आरडे, मंगल खुडे, वैशाली जाधव आदी उपस्थित होते.