कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर इतके प्रेम होते तर त्यांना राज्यसभेवर का पाठवले नाही, असा खडा सवाल खासदार संजय मंडलिक यांनी येथे उपस्थित केला.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी संजय मंडलिक यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. या नंतर महायुतीतील समर्थक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मंडलिक यांची भेट घेऊन मोठ्या प्रमाणात स्वागत व अभिनंदन केले. यानंतर मंडलिक यांनी आज काही मुद्द्यांवर भाष्य केले. त्यामध्ये त्यांचे लोकसभेचे प्रतिस्पर्धी शाहू महाराज यांच्या उमेदवाराचा मुद्दा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत बोलताना मंडलिक म्हणाले, शाहू महाराज यांच्यावर महाविकास आघाडीचे इतके प्रेम होते तर त्यांना राज्यसभेमध्ये का पाठवले नाही. आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यात लागू नये यासाठी त्यांना उमेदवारी दिली आहे. महाराजांना राज्यसभेवर पाठवले असते तर त्यांचा आणि कोल्हापूरच्या गादीचा सन्मान झाला असता. पण आता मात्र त्यांना गावोगावी फिरावे लागत आहे. तरीही या निवडणुकीत माझा विजय नक्की आहे, असा दावा त्यांनी केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay mandalik asked why shahu maharaj was not sent to the rajya sabha kolhapur amy