रक्षाबंधना दिवशीच लहानग्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तिटवेता(ता.  राधानगरी) येथे घडली. आरोहण संदीप घारे ( वय २ ) असे या बालकाचे नाव आहे. त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे  मोठ्या बहिणीचे राखी बांधण्याची इच्छा अपुरी राहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन गाभाऱ्यातून सुरू; भाविकांना राखी पौर्णिमेची भेट

संदीप घारे यांना आरोही, ओवी या दोन मुली आणि सर्वात लहान आरोहण मुलगा आहे. अलीकडे आरोहण याला आजाराने गाठले. तपासणीमध्ये ब्रेन ट्यूमर झाले असल्याचे निष्पन्न झाले. एप्रिल महिन्यात त्याच्यावर याबाबतची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. पण तेव्हापासून त्याची नजर गेली. आवाजावरून तो माणसे ओळखत असे. मंगळवारी तब्येत बिघडल्याने त्याला एका बालरोग तज्ञाकडे दाखल केले होते. आज त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असताना दोन्ही बहिणीने रुग्णालयात बघण्यास जाण्याचा कुटुंबियांकडे आग्रह केला होता. त्यांनी उद्या रक्षाबंधन साठी त्याला घरी घेऊन येऊ; मग राखी बांधा , असे समजावले होते. मात्र आता हे स्वप्न अपुरे राहिले असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two year old boy dies on raksha bandhan day due to long illness zws