ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते उसेन बोल्ट आणि मो फराह हे येथे सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. दुखापतीवर मात करीत पुन्हा स्पर्धात्मक अॅथलेटिक्समध्ये वर्चस्व राखण्याचे त्यांचे ध्येय आहे. या स्पर्धेतील १८ क्रीडाप्रकारांत ७१ देशांमधील ४ हजार ५०० हून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत.
जमैकाचा धावपटू बोल्टने आतापर्यंत सहा ऑलिम्पिक व आठ जागतिक सुवर्णपदके जिंकली आहेत. येथे मात्र तो फक्त ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भाग घेणार आहे. दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणारा फराह हा ५ हजार व १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-07-2014 at 12:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2014 commonwealth games usain bolt mo farah