आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एबी डिव्हीलियर्सने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. पुढची काही वर्ष डिव्हीलियर्स आयपीएलमध्ये खेळणार आहे, खुद्द डिव्हीलियर्सने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत डिव्हिलियर्सने हे स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर RCB ने ही आपल्या ट्विटर अकाऊंटवर डिव्हीलियर्सच्या स्पष्टीकरणाची माहिती दिली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र निवृत्तीनंतर डिव्हीलियर्स आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबद्दल मात्र संभ्रम निर्माण होता. अखेर डिव्हीलियर्सने केलेल्या स्पष्टीकरणानंतर त्याच्या चाहत्यांचा जीव अखेर भांड्यात पडला आहे.