रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील लोकप्रिय संघ आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी युनायटेड स्पिरिट्स या कंपनीकडे आहे. याच कंपनीच्या रॉयल चॅलेंज या ब्रँडच्या नावावरुन या संघाचे नाव ठेवण्यात आले. २००८ पासून आयपीएलमधील प्रमुख संघ असूनही या संघाला एकदाही विजेतेपद भूषवता आलेले नाही. आयपीएलच्या इतिहासामध्ये संघाकडून सर्वाधिक धावा (२६५) करण्याचा विक्रम या संघाने केला आहे, तसेच सर्वात कमी (४९) करण्याचा लाजिरवाणा विक्रमदेखील आरसीबीच्या नावावर आहे. २००८ मध्ये राहुल द्रविडकडे आरसीबीचे कर्णधारपद होते. त्यानंतर केविन पिटरसन, अनिल कुंबळे यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. पुढे २०११ मध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधार बनला.
२०२१ मध्ये त्याने हे पद सोडले. विराटनंतर फाफ डू प्लेसिसकडे नेतृत्त्व २०२२ मध्ये सुपूर्त करण्यात आले. आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्येही त्याच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. या संघाकडे आयपीएलमधील सर्वात मोठा चाहता वर्ग आहे.Read More
Virat Anushka Video Viral: विराट कोहलीने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान अनुष्का शर्माच्या चित्रपटातील डायलॉग बोलला, जे ऐकून अभिनेत्री खूपच आश्चर्यचकित झाली.
Naveen-Ul-Haq LSG vs MI IPL 2023: अफगाणिस्तानचा क्रिकेटर नवीन-उल-हकने मुंबईविरुद्धच्या सामन्यादरम्यान चाहत्यांच्या छेडछाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की,…