राष्ट्रीय कांस्यपदक विजेता आबा अटकुळेने सौरभ पाटीलवर मात करीत खाशाबा जाधव करंडक राज्य युवा कुस्ती स्पर्धेतील ६० किलो फ्रीस्टाइल गटात विजयी सलामी दिली. अटकुळेने राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्यामुळे त्याचे पारडे जड मानले जात होते. तथापि कोल्हापूरच्या सौरभ याने त्याला शेवटपर्यंत चिवट झुंज दिली. शालेय गटात सौरभने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. अनुभवाच्या जोरावर त्याने चांगले डाव केले. तथापि अटकुळे याने १२-१० अशी केवळ दोन गुणांनी ही लढत जिंकली. याच गटात अमरावती शहर संघाच्या अब्दुल हाफीज याने सांगलीच्या ज्योतीराम पाटील याच्यावर २-० असा निसटता विजय मिळविला. जळगावच्या अमोल महाजन यानेही विजयी प्रारंभ केला. त्याने चंद्रपूरच्या मयूर चोले याचा ६-० असा दणदणीत पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2015 रोजी प्रकाशित
आबा अटकुळेची विजयी सलामी
राष्ट्रीय कांस्यपदक विजेता आबा अटकुळेने सौरभ पाटीलवर मात करीत खाशाबा जाधव करंडक राज्य युवा कुस्ती स्पर्धेतील ६० किलो फ्रीस्टाइल गटात विजयी सलामी दिली.
First published on: 16-05-2015 at 06:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aba atkule wrestling