ajinkya rahane send yashasvi jaiswal out of field in duleel trophy west zone vs south zone match | Loksatta

खेळाडूसह बाचाबाची नडली, अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला दाखवला मैदानाबाहेरचा रस्ता; पाहा VIDEO

Ajinkya Rahane On Yashasvi Jaiswal : दुलिप ट्रॉफी सामन्यात अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढलं आहे.

खेळाडूसह बाचाबाची नडली, अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला दाखवला मैदानाबाहेरचा रस्ता; पाहा VIDEO
अजिंक्य रहाणे यशस्वी जैस्वाल ( संग्रहित फोटो )

कोइंबतूर येथे दुलीप करंडक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग यांच्यात हा सामना झाला होता. या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पश्चिम विभाग संघाने २९४ धावांनी दक्षिण विभागाचा पराभव केला आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात झालेल्या वादमुळे हा दिवस चर्चेत राहिला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्यातून युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल या मैदानाच्या बाहेर काढलं.

पश्चिम विभागाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण विभाग संघ फलंदाजी करत होता. यावेळी रवी तेजा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात बाचाबाची झाली. यशस्वी जैस्वाल सतत स्लेजिंग करत असल्याने अंपायरने दोन वेळा त्याला इशारा दिला होता. मात्र, ५० व्या षटकात जैस्वाल आणि रवी तेजा यांच्या जोरदार वाद झाला.

तेव्हा तिथे असलेल्या अजिंक्य रहाणेने मध्यस्ती केली आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रहाणेने समजूत काढल्यानंतर काहीवेळ जैस्वाल शांत राहिला. मात्र, परत रवी तेजाकडे पाहून काहीतरी बोलत होता. त्यावेळी अंपायरने अजिंक्य रहाणेकडे त्याची तक्रार केली. मग रहाणेने नाईलाजास्तव यशस्वी जैस्वाल याला मैदानाबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर ६५ व्या षटकात जयस्वालला क्षेत्ररक्षणासाठी बोलवण्यात आलं.

हेही वाचा – अजिंक्य रहाणेच्या संघाने रचला इतिहास, १९व्यांदा कोरले दुलीप करंडकावर नाव

जैस्वालने ठोकली दोन शतके

दरम्यान, दक्षिण विभाग विरुद्ध पश्चिम विभाग यांच्यात हा सामना रंगला होता. या सामन्यात पश्चिम विभागाने ५२९ धावांचे आव्हान समोर ठेवले होते. मात्र, दक्षिण विभाग २३४ धावांवरच सर्वबाद झाला. पश्चिम विभागाने हा सामना २९४ धावांनी जिंकला. या सामन्यात यशस्वी जैयस्वालने दोन शतके ठोकली. यशस्वीने ३२३ चेंडूत २६४ धावा केल्या, ज्यात ३० चौकार ४ षटकारांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Ind vs AUS 3rd T20: विराट-सूर्यकुमारची भन्नाट फलंदाजीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिकाही

संबंधित बातम्या

६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ
FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या गोलवर रोनाल्डोचा दावा? Video शेअर करत नेटिझन्सने केले ट्रोल
“जर मी आक्रमक झालो तर त्याला..”, IND vs NZ आधी अर्शदीप सिंगचं उमरान मलिकबाबत मोठं विधान
FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिस ठरला विजयाचा शिल्पकार, उरुग्वेवर मात करत पोर्तुगाल राउंड १६ मध्ये दाखल
आशिष नेहराची मोठी भविष्यवाणी; ‘हा’ युवा फलंदाज भारतीय संघाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ल्याचा कट”; राऊतांच्या दाव्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले, “ते स्वत:ला…”
विश्लेषण: सॅनिटरी पॅड, टॅम्पॉनस किंवा पिरियड कपने होऊ शकतो कॅन्सर? दाव्यामध्ये कितपत तथ्य? काय काळजी घ्यायला हवी?
Video : “कोणालाचा झोपू देणार नाही” राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ड्रामा सुरू, मध्यरात्रीच मागितली कॉफी अन्…
पुणे: राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले, नेमकं झालं काय?
बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”