Premium

CSK च्या ‘या’ स्टार खेळाडूबाबत आकाश चोप्राने केला मोठा खुलासा, म्हणाला, “पुढचा सचिन तेंडुलकर…”

आकाश चोप्राने सीएसकेच्या एका स्टार खेळाडूबाबत मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या चोप्राने नेमकं काय म्हटलं आहे याबाबत.

Akash chopra on ambati rayudu
आकाश चोप्राने सीएसकेच्या दिग्गज खेळाडूबाबत मोठं विधान केलं, (Image-Indian Express)

Akash Chopra Big Statement About CSK Star Player : इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या फायनलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. आयपीएलच्या १६ व्या हंगामाच्या समारोपावेळी दिग्गज फलंदाज अंबाती रायुडूने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. रायडूच्या करिअरचे जबरदस्त किस्से टीम इंडियाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. सीएसकेच्या या स्टार फलंदाजाबाबत बोलताना चोप्रा म्हणाला, अंबाती रायुडूची ‘पुढचा सचिन तेंडुलकर’ बनण्याच्या आशेनं सुरुवातीच्या काळात निवड केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “मी घेतलेल्या अंबाती रायुडूच्या पहिल्या मुलाखतीबाबत एक छोटासा किस्सा सांगत आहे. हा २००३ चा भारत ए चा वेस्टइंडिज दौरा होता. अंबाती रायुडू नावाच्या एका छोट्या मुलाची यासाठी निवड करण्याता आली होती. तो त्यावेळी १६ वर्षांचा असेल.” चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलच्या व्हिडीओत म्हटलं, ” त्याला या आशेनं घेतलं होतं की, तो पुढचा सचिन तेंडुलकर बनेल. हा मुलगा खूप प्रतिभावंत आहे. तो अप्रतिम फलंदाजी करू शकतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतो आणि गोलंदाजीही करू शकतो.”

नक्की वाचा – Junior Hockey Asia Cup 2023: भारताने पाकिस्तानला धूळ चारली! ज्यूनियर एशिया कपचा किताब जिंकून रचला इतिहास

आकाशने खुलासा केला की, रायुडूची काळजी घेण्यासाठी संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना निर्देश देण्यात आले होते. कारण त्याला एक विलक्षण खेळाडू म्हणून ओळखलं जायचं.” अशोक मल्होत्रा त्यावेळी आमचे प्रशिक्षक होते आणि निवडकर्त्यांकडून या छोट्या मुलाची काळजी घेण्यासाठी विशेष निर्देश देण्यात आले होते. कारण तो भारताचा भविष्य होता. वीवीएस लक्ष्मण त्या दौऱ्यावर कर्णधार होता आणि त्यांनी रायुडूला हैद्राबादमध्ये खेळताना पाहिलं होतं. परंतु, जेव्हा तुम्ही संघाची निवड करता त्यावेळी तुम्हाला सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 11:46 IST
Next Story
“शुबमन गिलचा ऍटिटयूड जरा…” WTC आधी ऑस्ट्रेलियन स्टार रिकी पॉंटिंगचे मोठे विधान; म्हणाला, “त्याचा क्लास..”