Akash Chopra on Sanju Samson: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला सात महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याआधी भारताचे अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने ते विश्वचषक खेळणे कठीण झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या अगोदर माजी खेळाडू आकाश चोप्राने ट्विटवरुन संजू सॅमसनबद्दल एक प्रश्न विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नियमित कर्णधार रोहित शर्मा मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही, तर मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. दोन खेळाडूंना वगळल्यानंतरही बीसीसीआयने त्यांच्या बदली खेळाडूंची घोषणा केली नाही, त्यामुळे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने संजू सॅमसनला संघात संधी मिळायला हवी का? असा प्रश्न विचारला आहे.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास झाला, त्यामुळे तो वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रेयस मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी संजू सॅमसनचे नाव चर्चेत होते, परंतु बीसीसीआयने संघात कोणतेही नवीन नाव जोडलेले नाही.

हेही वाचा – IND vs AUS: वसीम जाफरने पहिल्या वनडेसाठी निवडली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान

आकाश चोप्राने ट्विटरवर लिहिले की, “रोहित पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नाही. श्रेयस अय्यर संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध नाही. संजू सॅमसनचा संघात समावेश करावा का?” यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

संजू सॅमसनने २०२२ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली खेळी खेळली. त्याने १० सामन्यात ७१ च्या सरासरीने २८४ धावा केल्या. तथापि, २०२३ मध्ये सॅमसनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. आतापर्यंत एकाही मालिकेत त्याला स्थान मिळाले नाही. पंतच्या दुखापतीनंतरही संजूला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत स्थान मिळाले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra took to twitter to ask whether sanju samson should get india odi team or not vbm