Premium

MS Dhoni : “जर २० किलो वजन कमी केले, तर मी आयपीएलमध्ये…”, अफगाणिस्तानच्या खेळाडूचा माहीबद्दल मोठा खुलासा

Asghar Afghan revealed : एमएस धोनी अफगाणिस्तानचा खेळाडू शहजादसाठी असगर अफगाणशी बोलताना एक आश्वासन दिले होते. तो म्हणाला होता, या खेळाडूने जर वजन कमी केले, त्याची आयपीएल खेळण्यासाठी निवड करेन.

Asghar Afghan's disclosure about Dhoni
महेंद्रसिंग धोनी (फोटो-एपी फोटो)

Asghar Afghan revealed that Dhoni had told Shahzad : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२४) ची तयारी सुरू झाली आहे. १९ डिसेंबरला खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. दुबई येथे होणाऱ्या आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात अनेक देशांच्या संघातील खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आता अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगाणने मोहम्मद शहजाद आणि महेंद्रसिग धोनी यांच्यातील एका मजेदार घटनेचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेट विश्वात असे काही खेळाडू आहेत, ज्यांचा फिटनेस तितकासा चांगला नाही. पण तरीही त्याची कामगिरी अप्रतिम राहिली असून ते आपल्या देशाच्या संघासाठी क्रिकेट खेळले आहेत. अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद हा त्या खेळाडूंपैकी एक आहे. ज्याला महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला होता. शहजादने अफगाणिस्तान संघासाठी ८४ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २७२७ धावा केल्या आहेत, ज्या दरम्यान त्याने आपल्या बॅटने ६ शतके झळकावली आहेत. याशिवाय तो अफगाणिस्तान संघासाठी ७३ टी-२० सामनेही खेळला आहे. ज्यामध्ये त्याने बॅटमधून २०४८ धावा केल्या आहेत.

शहजादच्या या उत्कृष्ट विक्रमानंतरही त्याचे वजन नेहमीच चर्चेचा विषय राहीले. शहजादबद्दल, अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असगर अफगाणने एक मजेदार घटना सांगितली. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील सामील होता. मोहम्मद शहजादला आयपीएल खेळायचे होते. त्यामुळे धोनीने आश्वासन दिले होते की, शहजादने २० किलो वजन कमी केले, तर तो त्याला आयपीएल खेळण्यासाठी आमंत्रित करेल. पण त्याऐवजी शहजादने ५ किलो वजन वाढवले. असगरने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण घटनेबद्दल सांगितले.

हेही वाचा – 6 Ball 6 six! २४ चेंडूत शतक अन् ४३ चेंडूत… हमजा सलीम दारने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम

असगर म्हणाला की “आशिया चषक २०१८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळलेला सामना टाय झाला होता. त्यानंतर त्याने एमएस धोनीशी दीर्घ संवाद साधला. धोनी हा एक उत्कृष्ट कर्णधार आणि तो एक अद्भुत माणूस देखील आहे. धोनीसोबतच्या संवादादरम्यान आम्ही मोहम्मद शहजादबद्दलही चर्चा केली. मी धोनीभाईला सांगितले की, शहजाद तुमचा खूप मोठा चाहता आहे, यावर धोनी म्हणाला की शहजादचे पोट मोठे आहे. जर त्याने २० किलो वजन कमी केले, तर मी त्याला आयपीएलमध्ये निवडेन, पण जेव्हा शहजाद मालिकेनंतर अफगाणिस्तानला परतला, तेव्हा त्याचे वजन ५ किलोने वाढले होते.”

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asghar afghan revealed that dhoni had told shahzad that he would pick him for the ipl if he lost 20 kg vbm

First published on: 08-12-2023 at 17:40 IST
Next Story
6 Ball 6 six! २४ चेंडूत शतक अन् ४३ चेंडूत… हमजा सलीम दारने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम