नागपुरात पार पडलेल्या इराणी करंडकाच्या लढतीत विदर्भाने शेष भारतावर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मात करत विजेतेपद पटकावलं. शेष भारताकडून हनुमा विहारी हा दोन्ही डावांमधला हिरो ठरला. सलग दोन डावांत शतकी खेळी करत हनुमा विहारीने आपल्या संघाकडून चांगली लढत दिली. या खेळीमुळे इराणी करंडकात सलग 3 डावांमध्ये शतक झळकावणारा हनुमा विहारी पहिला फलंदाज ठरला आहे. सामना संपल्यानंतर हनुमा विहारीने आपल्या भारतीय संघातील अनुभवामुळे आपण ही खेळी करु शकलो असं म्हणलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – स्थानिक क्रिकेटमध्ये विदर्भाची दमदार एन्ट्री ! मुंबई, कर्नाटकाच्या पंक्तीत मिळवलं स्थान

“ज्या क्षणी तुम्हाला खात्री पटते की तुम्ही आंतरराष्ट्रीय संघाचा भाग असणार आहात, त्यावेळी तुमचा आत्मविश्वास आपसूक वाढतो. स्थानिक क्रिकेटमध्ये तुम्ही सहज खेळ करु शकता याची तुम्हाला खात्री पटते.” विहारी पत्रकारांशी बोलत होता. अंतिम सामन्यात हनुमा विहारीने 114 आणि नाबाद 180 धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – विदर्भाचा दबदबा कायम ! सलग दुसऱ्यांदा पटकावला इराणी करंडक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Being with indian test team has increased my confidence says vihari