सहा षटकार म्हंटले की प्रत्येक भारतीयाला आठवतात ते स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर युवराज सिंगने लागवलेले सहा चेंडूतील सहा षटकार. यात विशेष म्हणजे हा पराक्रम युवीने टी२० विश्वचषकादरम्यान केला होता. त्यावेळी युवीने १२ चेंडूत ५० धाव करत एका विक्रमाशी बरोबरी देखील केली होती. या पराक्रमाला जवळपास ११ वर्ष होऊन गेली, पण तरीदेखील सध्या हा पराक्रम चर्चच्या आला आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा नवोदित अष्टपैलू खेळाडू सॅम कुरान याने सहा षटकार लगावले. हे षटकार त्याने सलग लगावले नव्हते. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ६ षटकार लगावले आणि केवळ १ चौकार फटकावला. त्याच्या या खेळीची क्रिकेटविश्वात दखल घेण्यात आली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याचे अभिनंदन तर केलेच. पण यासह ECBने एक इंस्टाग्रामवर एक पोस्टही टाकली. यात चौकार लागवण्याआधी कोणत्या खेळाडूने सहा षटकार लगावलेले आठवत आहेत का? असा थोडासा मुजोर प्रश्न ECBने इंस्टाग्रामवर विचारला.
त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. पण त्यात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याची प्रतिक्रिया सर्वात महत्वाची ठरली. त्याच्या प्रतिक्रियेमुळे त्या प्रश्नातील हवाच निघून गेली आणि इंग्लंडसाच्या गर्वाचे घर आपोआपच खाली झाले.
दरम्यान, नेटकऱ्यांनीही ब्रॉडच्या रिप्लायनंतर ECBची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही.