चांगझो : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारा एच. एस. प्रणॉय आणि यापूर्वीचा कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मंगळवारी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत निराशा केली. दोघांचेही आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सुपर १०००’ मानांकन दर्जा प्राप्त असलेल्या या स्पर्धेत प्रणॉयला मलेशियाच्या एन्ग त्झे योंगकडून १२-२१, २१-१३, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत प्रणॉय सहाव्या, तर योंग २२व्या स्थानवार आहे. प्रणॉयपाठोपाठ लक्ष्यला डेन्मार्कच्या अ‍ॅण्डर्स अ‍ॅन्टोन्सेनकडून २१-२३, २१-१६, ९-२१ अशी हार पत्करावी लागली. प्रियांशू राजावतलाही पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या जिया यी फॅनने प्रियांशूला २१-१३, २६-२४ असे नमवले.

या तिघांच्या पराभवाने भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. महिला एकेरीत एकही भारतीय खेळाडूचा सहभाग नाही. पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिराग जोडीकडून अपेक्षा आहेत.

हेही वाचा >>>“…तर पाकिस्तान ‘इंडिया’ नावावर दावा सांगू शकतो”; ‘त्या’ ट्वीटवर सेहवागची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाला…

महिला दुहेरीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीलाही पहिल्याच फेरीत आव्हान गमवावे लागले. अव्वल मानांकित चेन क्विंग चेन आणि जिया यी फॅन या चीनच्या जोडीने भारताच्या जोडीचा २१-१८, २१-११ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China open badminton h s prannoy and lakshya sen defeated in first round amy