हवेत उडणारे लांब केस असो किंवा मुंडण केलेले असो भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी त्याच्या मेकओव्हरसाठी ओळखला जातो. धोनीचा नवा लूक एका कालावधीसाठी ट्रेंडमध्ये असतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची ‘क्रेझ’ कमी झालेली नाही. इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने गुरुवारी धोनीचा एक नवीन फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो भन्नाट दिसत आहे. हा फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाला.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी महेंद्रसिंह धोनीचा नवीन लूक असल्याची चर्चा रंगली आहे. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. फोटो शेअर करत स्टार स्पोर्ट्सने लिहिले, ”एमएस धोनी आयपीएलपूर्वी नवीन आहे. खऱ्या पिक्चरसाठी आमच्याबरोबर राहा.”

 

 

काही दिवसांपूर्वी, धोनीचा एक कूल लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमने त्याचा हा लूक केला होता. धोनी आता आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसणार आहे. १९ सप्टेंबर रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. करोनाच्या प्रकरणांमुळे भारतात सुरू करण्यात आलेला आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता.

हेही वाचा – ‘‘…अशी गोष्ट करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान”, कपिल देव यांनी मोदींवर केला कौतुकाचा वर्षाव

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे भारतीय खेळाडू यूएईला पोहोचले आहेत. सीएसके टीम दुबईत प्रशिक्षण घेईल. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर खेळाडूंना सराव करण्याची उत्तम संधी असेल. सुरेश रैना, कर्ण शर्मा, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर आणि अंबाती रायुडू हे खेळाडू दुबईला पोहोचले आहेत.