Duleep Trophy 2024 Rishabh Pant Video Viral : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. ऋषभ पंत सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे आणि त्याच्या इंडिया बीकडून खेळताना त्याने इंडिया ए विरुद्धच्या दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करत अर्धशतकी खेळी साकारली. पण यावेळी तो त्याच्या फलंदाजीमुळे किंवा यष्टीरक्षणाने चर्चेत आला नाही. पंत चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने एक अशी कृती केली आहे, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. त्यामुळे कोणता व्हिडीओ आहे जाणून घेऊया.

ऋषभ पंतचा व्हिडीओ व्हायरल –

दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, इंडिया ए संघाचा कर्णधार शुबमन गिल टीम हर्डलमध्ये आपल्या खेळाडूंशी संवाद साधत होता, त्यादरम्यान ऋषभही त्या हर्डलमध्ये सामील झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की ऋषभ पंत हा भारत बी संघाचा एक भाग आहे आणि तो त्याच्या प्रतिस्पर्धी संघाच्या हर्डलमध्ये जाऊन सर्व काही ऐकत होता. या ऋषभच्या मजेशीर कृतीचा व्हिडीओ बीसीसीआय डोमेस्टिकने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ऋषभ पंतचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून चाहतेही शेअर करत आहेत. पंतला विरुद्ध संघाच्या कोणत्याही खेळाडूने हर्डलमध्ये सहभागी होताना अडवले नाही. यावरून पंतचे इतर खेळाडूंशी कसे संबंध आहेत हे स्पष्ट होते.

हेही वाचा – ‘पाकिस्तानला गौतम गंभीरसारख्या कणखर प्रशिक्षकाची गरज…’, दानिश कनेरियाचे वक्तव्य; म्हणाला, तो मागे न बोलता समोरच…

ऋषभ पंतचे शानदार अर्धशतक –

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंत संघात पुनरागमन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे, त्यामुळे दुलीप ट्रॉफीमधील कामगिरीसोबतच त्याच्या फिटनेसकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात पंतने नक्कीच निराशा केली होती. पण दुसऱ्या डावात तो अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला. इंडिय ए संघाविरुद्धच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा त्याच्या संघाने केवळ २२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. येथून पंतने आपल्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम केले.

हेही वाचा – Paralympics 2024 : जपानच्या खेळाडूने व्हीलचेअर टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर केले अनोखे सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

ऋषभ पंतने अवघ्या ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. मात्र, पंत ४७ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतने २०२२ साली बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात केवळ २२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले, जे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक आहे.