ENG vs SL 1st Test India’s Former Cricketer Son: यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला २१ ऑगस्टपासून मँचेस्टरमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव २३६ धावांवर आटोपला. त्यानंतर खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ४ षटकांत २२ धावा केल्या होत्या. या सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने एका खेळाडूला मैदानात उतरवले ज्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. खरे तर मँचेस्टर कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले होते. श्रीलंकेने फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच हॅरी सिंगला इंग्लंडने पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरवले.

हेही वाचा – KL Rahul: केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती? काय आहे व्हायरल इन्स्टाग्राम स्टोरीमागचं सत्य

कोण आहे हॅरी सिंग (Who is Harry Singh?)

नाणेफेकीनंतर लगेचच तिसऱ्या षटकात हॅरी सिंग मैदानात उतरला आणि ३७व्या षटकात हॅरी ब्रूकच्या जागी लंचब्रेकनंतर मैदानात परतला. हॅरी इंग्लंड संघाचा १२वा खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि अल्पावधीतच तो क्रिकेट विश्वात प्रसिद्ध झाला. आता प्रश्न असा येतो की इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतानाही त्याच्या नावाची एवढी चर्चा का होत आहे? कारण, हॅरी सिंग हा भारतीय आहे आणि मुख्य म्हणजे तो भारताचा माजी गोलंदाज आरपी सिंग सीनियर यांचा मुलगा आहे.

हेही वाचा – Australia U19 Women’s Squad: भारतीय वंशाच्या लेकी कांगारू संघात, पाहा कोण आहेत या खेळाडू?

कोण आहेत आरपी सिंग सिनीयर?

आरपी सिंग सीनियर यांनी १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यांनी फक्त २ एकदिवसीय सामने खेळले आणि परत पुनरागमन करू शकले नाहीत. मात्र, ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिले. त्यांनी ५९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १४१३ धावा करण्यासोबतच १५० विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी २१ सामने खेळले आणि २६ विकेट घेतल्या. निवृत्तीनंतर, आरपी सिंग सिनीयर १९९० दशकाच्या उत्तरार्धात इंग्लंडला गेले, जिथे त्यांनी लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – Neeraj Chopra: नीरज चोप्राची डायमंड लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी, ऑलिम्पिकचा रेकॉर्ड मोडत केला बेस्ट थ्रो; पाहा VIDEO

२००४ साली इंग्लंडमध्ये जन्मलेल्या हॅरीला त्याच्या वडिलांना पाहून क्रिकेटचे आकर्षण वाटू लागले आणि त्यांनी बालपणीच क्रिकेट खेळायला सुरूवात केली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हॅरी सिंगने आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. हॅरी सिंगने २०२२ मध्ये इंग्लंडच्या अंडर-१९ संघात स्थान मिळवले. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला एकदिवसीय चषकात लँकेशायरसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याने सर्व ७ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी देखील केली. लँकेशायरकडून सलामी करताना हॅरीने ७ सामन्यात ८७ धावा केल्या आणि २ विकेटही घेतल्या.

आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला जम बसवत असताना, लँकेशायरच्या हॅरी सिंगचा संघसहकारी चार्ली बर्नार्ड आणि केशा फोन्सेका यांच्यासोबत ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे इंग्लंडच्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी १२वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.