IPL 2021 : मुंबईला हरवल्यानंतर KKRच्या कप्तानाला बसला जबर फटका! चुकवावी लागणार ‘मोठी’ किंमत

२३ सप्टेंबरला खेळलेल्या सामन्यात KKRने मुंबई इंडियन्सला सहज हरवले, त्यानंतर ईऑन मॉर्गनला…

Eoin morgan has been fined rs 24 lakh for maintaining a slow over-rate against mumbai indians
केकेआरने मुंबईचा ७ गडी राखून पराभव केला.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने (केकेआर) दणदणीत सुरुवात केली आहे. पहिले त्यांनी विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवले आणि आता त्यांनी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचाही ७ गडी राखून सहज पराभव केला. यासह, केकेआरने गुणतालिकेत टॉप-४ मध्ये स्थान मिळवले आहे. एकीकडे केकेआरने सामना जिंकला, तर दुसरीकडे त्याचा कर्णधार ईऑन मॉर्गन अडचणीत सापडला आहे.

ईऑन मॉर्गनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासह, टीमच्या उर्वरित सदस्यांना ६ लाख रुपये दंड किंवा मॅच फीच्या २५ टक्के रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागणार आहे. आयपीएलने म्हटले, “कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार ईऑन मॉर्गनला अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या स्लो ओव्हर रेटशी संबंधित नियमांनुसार, संघ दुसऱ्यांदा निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला आणि म्हणून मॉर्गनला २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.”

हेही वाचा – बापरे… ‘त्यांनी’ आठ दिवसात खाल्ली २७ लाखांची बिर्याणी; बिल पाहून PCB च्या अधिकाऱ्यांनी…

सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यर (५३) आणि राहुल त्रिपाठी (नाबाद ७४) यांनी कोलकाता नाईट रायडर्सला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रात केकेआरचा हा सलग दुसरा विजय आहे, तर मुंबईचा हा सलग दुसरा पराभव होता.

केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या संघाने १५.१ षटकांत तीन गडी बाद १५९ धावा करून सामना जिंकला. आयपीएलचा दुसरा सामना खेळताना अय्यरने ३० चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. दुसरीकडे, राहुल त्रिपाठी ४२ चेंडूत ७४ धावांवर नाबाद राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eoin morgan has been fined rs 24 lakh for maintaining a slow over rate against mumbai indians adn

फोटो गॅलरी