यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघातून हकालपट्टीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यातील काही चाहते सॅमसनच्या समर्थनार्थ बॅनर घेऊन फिफा विश्वचषक २०२२ सामना पाहण्यासाठी कतारला पोहोचले. सॅमसन दीर्घकाळापासून आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, पण त्याला भारतीय संघात सातत्यपूर्ण संधी मिळत नाहीयेत. या कारणामुळे संजू सॅमसनचे चाहते निवड समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापनावर नाराज आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यांत जेव्हा जेव्हा संघाची घोषणा होते किंवा संजू सॅमसनला कोणत्याही सामन्यात खेळण्याची संधी मिळत नाही तेव्हा त्याचे चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करतात. सॅमसनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात तो भारतीय संघाचा भाग होता. या सामन्यात त्याने चांगली कामगिरी करत श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारी केली आणि भारताला ३०० पार पोहचवून संकटातून बाहेर काढले. असे असतानाही संघाचा समतोल नीट साधला जात नसल्याने त्याला दुसऱ्या सामन्यात संघातून वगळण्यात आले.

हेही वाचा :   ज्याला संघात स्थान मिळत नाही त्याला गौतम गंभीर म्हणाला, टीम इंडियाचा भावी कर्णधार

यानंतर संजूचे चाहते चांगलेच संतापले. काही चाहते संजू सॅमसनच्या समर्थनार्थ बॅनर घेऊन कतारमध्ये फिफा विश्वचषक सामना पाहण्यासाठी गेले होते. बॅनरवर “सामना, संघ आणि खेळाडू यांच्या पलीकडे, संजू सॅमसन, आम्ही तुझ्यासोबत आहोत.” यासोबतच बॅनरमध्ये संजू सॅमसनचे अनेक फोटो होते, ज्यामध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाच्या जर्सीत दिसत होता.

सॅमसन दुसऱ्या सामन्यात का खेळला नाही

दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनच्या जागी दीपक हुडाचा संघात समावेश करण्यावर भारतीय कर्णधार शिखर धवन म्हणाला की संघात सहावा गोलंदाजीचा पर्याय नाही. त्यामुळे संजू सॅमसनच्या जागी दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय पूर्ण होऊ शकला नाही आणि पावसामुळे तो रद्द करावा लागला. मालिकेतील तिसरा सामना ३० नोव्हेंबरला ख्राईस्टचर्च येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 samson craze not only in cricket but also on the football field banners in stadiums in support of sanju avw
First published on: 28-11-2022 at 15:13 IST