इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पध्रेमुळे भारतात फुटबॉलची ओढी अधिक निर्माण झाली आहे. येत्या काही वर्षांत फुटबॉलची लोकप्रियता क्रिकेटलाही टक्कर देईल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. तसेच त्याने २०१७मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेसाठी भारतीय क्रीडाप्रेमी आतुर असल्याचेही सांगितले. तो म्हणाला, ‘‘फुटबॉल विश्वचषक स्पध्रेची भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत. ही भव्य स्पर्धा होईल. भारतासाठी ही चांगली बाब आहे, कारण आयएसएलची प्रत्येक जण प्रशंसा करत आहेत. त्यात फिफाचे भारतातील आगमन ही मोठी बाब आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2015 रोजी प्रकाशित
फुटबॉलची लोकप्रियता क्रिकेटलाही टक्कर देईल -तेंडुलकर
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पध्रेमुळे भारतात फुटबॉलची ओढी अधिक निर्माण झाली आहे.

First published on: 08-12-2015 at 05:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football will give more popularity than cricket sachin tendulkar