आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाने अनेक नव्या खेळाडूंना क्षणार्धात करोडपती बनवले. यापैकी एक म्हणजे उत्तर प्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल. लिलावात जेव्हा त्याचे नाव पुकारले गेले, तेव्हा फार कमी लोक या गोलंदाजाला ओळखत होते. पण आयपीएल फ्रेंचायझींना या खेळाडूची क्षमता माहीत होती. २० लाखांच्या मूळ किंमतीत नव्हे, तर यशला गुजरात टायटन्सने ३.२० कोटी रुपयांना संघात दाखल केले. तो सध्या रणजी ट्रॉफीसाठी गुरुग्राममध्ये आहे. जिथे त्याला त्याच्या टीम उत्तर प्रदेशसह एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यश दयाल आपल्या हॉटेलच्या खोलीत आयपीएलचा लिलाव पाहत होता. पण त्याचे नाव येत नव्हते, म्हणून तो टीव्ही बंद करून आणि मोबाईल फोनही सायलेंट करून झोपला. पण तासाभरानंतर जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा त्याच्या फोनवर मित्र आणि कुटुंबीयांचे मिस्ड कॉल्स आणि मेसेज आले होते. वडील चंद्रपाल दयाल यांचे २० मिस्ड कॉल यशच्या फोनवर होते. त्याने आधी त्याच्या वडिलांना फोन केला, नंतर कळले की त्याची आयपीएलमध्ये निवड झाली आहे आणि गुजरात टायटन्स संघाने त्याला मूळ किमतीच्या १६ पट देऊन ३.२ कोटी रुपयांना खरेदी केले.

हेही वाचा – IPL 2022 : CSKनं सुरेश रैनाला दिला ‘असा’ निरोप; नेटकरी म्हणाले, ‘‘ओवरअ‍ॅक्टिंग बंद करा…”

चंद्रपाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “यश फोन का उचलत नाही याची आम्हाला काळजी वाटत होती. जेव्हा मी त्याला लिलावाबद्दल सांगितले तेव्हा त्याला वाटले की मी त्याला मूर्ख बनवत आहे. संघाचा एकही खेळाडू त्याच्या खोलीत गेला नाही. कारण करोना प्रोटोकॉलमुळे खेळाडूंना टीम हॉटेलमध्ये फिरण्याची परवानगी नाही.”

यशने गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. ७ सामन्यांमध्ये या गोलंदाजाने १४ विकेट घेतल्या. यश स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. शिवाय तो १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्यास तो कमालीचा उत्सुक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat titans picked left arm pacer yash dayal for rs 3 2 crore adn