Harshit Rana IPL 2024 Auction: बीसीसीआयने आगामी ऑस्टेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या वनडे आणि टी -२० संघात हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयकडून संघाची घोषणा होताच एकच प्रश्न उपस्थित केला जातोय, ते म्हणजे हर्षित राणाच का? अनेकांनी त्याला गौतम गंभीरचा खास असल्याने संधी दिली जात आहे, असं म्हटलं आहे. पण हे सर्व कुठून सुरू झालं? गंभीर, आयपीएल आणि हर्षित राणाचं काय कनेक्शन आहे? जाणून घ्या.

हर्षित राणा आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. याच संघाकडून खेळताना त्याने २०२२ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याला या संघाकडून ३४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ४० गडी बाद केले आहेत. २०२४ मध्ये गोलंदाजी करताना त्याने १९ गडी बाद केले होते. यासह तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी होता. त्यामुळे केकेआरने त्याला रिटेन करण्यावर अधिक भर दिला. इथपर्यंत त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नव्हती.

केकेआरने उंचावली २०२४ आयपीएल २०२५ स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी

आयपीएल २०२४ स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेत जेतेपदाना मान पटकावला होता. हे जेतेपद मिळवून देण्यात गंभीरचाही मोलाचा वाटा होता. गंभीरने मेंटॉरची भूमिका पार पाडली होती. आयपीएल झाल्यानंतर, राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार होता, त्यामुळे भारतीय संघाला नव्या मुख्य प्रशिक्षकाची गरज होती. अखेर बीसीसीआयने ९ जुलै २०२४ला गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदी नियुक्ती केली. गौतम गंभीरने हर्षित राणाला केकेआरमध्ये असतानाही संधी दिली होती. त्यामुळे भारतीय संघाची जबाबदारी मिळाल्यानंतर हर्षित राणाला सातत्याने संधी दिली गेली तर काही वावगं ठरणार नाही. हे आधीपासूनच सर्वांना माहीत होतं आणि झालंही तसंच. हर्षित राणाला खूप कमी कालावधीत टी-२०,वनडे आणि कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.

हर्षित, गंभीरचं आयपीएल कनेक्शन

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक असताना हर्षित राणा भारतीय संघाचा भाग होता. पण त्याला पदार्पण करण्याची संधी दिली गेली नव्हती. आयपीएलच्या नियमानुसार, अन्कॅप्ड खेळाडूला कमी किमतीत रिटेन करण्याचा पर्याय कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाला हर्षित राणा संघात हवा होता. त्यामुळे गंभीरने त्याला पदार्पणाची संधी दिली नव्हती. त्यामुळे त्याला ४ कोटी रूपयात रिटेन करण्यात आलं होतं. ज्यावेळी त्याला पदार्पण करण्याची संधी मिळणार होती, त्यावेळी त्याला ताप आल्याचं म्हटलं गेलं होतं. आयपीएलच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर हर्षित राणाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे केकेआरला हर्षित राणाला मोठी रक्कम न देता रिटेन करता आलं होतं.