टी-२० विश्वचषक २०२२ मधील ३६ वा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. आजचा हा सामना जर दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर उपांत्य फेरी गाठणारा तो पहिला संघ बनेल. दुसरीकडे, पाकिस्तान पराभूत होताच स्पर्धेतून बाहेर पडेल. संघ जिंकला तर उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा अबाधित राहतील. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाणेफेक दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने सांगितले की, डेव्हिड मिलर आणि केशव महाराज पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यातून बाहेर पडले आहेत. भारतीय चाहत्यांना मिलरची एक्झिट पचवता येत नाही. कारण जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर भारताच्या अडचणी वाढणार आहेत. त्याचबरोबर माजी खेळाडू गौतम गंभीरने सुद्धा डेव्हिड मिलर प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याने मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरही दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनवर चांगलाच नाराज होता. आफ्रिकन संघातून कोणाला वगळायला हवे असेल तर तो टेंबा बावुमा आहे, असेही त्याने म्हटले आहे. नाणेफेकीनंतर गौतम गंभीर म्हणाला, ”मिलरला बाहेर करणे समजण्यापलीकडे आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघातून कोणी बाहेर असायला हवे असेल तर ते टेंबा बावुमा आहे.”

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, मिलरने संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून देण्यासाठी शानदार खेळी खेळली. त्यामुळे मिलरच्या बाहेर होण्याने पाकिस्तानचा धोका कमी झाला आहे.

हेही वाचा – आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावे जाहीर, विराट कोहलीच्या नावाचा देखील समावेश

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतग्रस्त फखर जमानच्या जागी पाकिस्तानने अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हरिसची संघात निवड केली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने जखमी डेव्हिड मिलरच्या जागी हेनरिक क्लासेन आणि केशव महाराजांच्या जागी तबरेझ शम्सी यांची निवड केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If anyone should be out it is temba bavuma gautam gambhir furious after david miller ruled out of the pakistan match due to injury vbm