Mohammed Shami Breaks Silence On Sania Mirza Marriage Rumours : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा विवाहबंधनात अडकणार आहेत. अलीकडे या बातमीने अफवांचा बाजार तापला होता. दोघांचे बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रकरण इथपर्यंत पोहोचले की सानियाच्या वडिलांना या अफवांच खंडन करावे लागले होते. यावर आता मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका यूट्यू चॅनेलवर सविस्तर मुलाखत दिली आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सानिया मिर्झाबरोबरच्या लग्नाच्या अफवांवर मोहम्मद शमीने यूट्यूबर शुभंकर मिश्राशी संवाद साधताना सांगितले की, लोकांनी विचारपूर्वक मीम्स बनवले पाहिजेत. काहींसाठी हा विनोद आहे तर काहींसाठी तो जीवनाशी संबंधित आहे. स्टार गोलंदाजाने अशा अफवा पसरवणाऱ्यांना आव्हान दिले की, दम असेल तर त्यांनी व्हेरिफाईड पेजवरून असे काहीतरी करून दाखवावे.

मोहम्मद शमीला कसे कळले?

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी लग्न करणार असल्याची बातमी भारतीय वेगवान गोलंदाजाला कशी कळली? या प्रश्नाचे उत्तर देताना मोहम्मद शमी म्हणाला, “काही नाही, तुम्ही फोन उघडला तर त्यात तुमचाच फोटो दिसतो, तुम्ही त्याचे काय कराल? मला एकच सांगावेसे वाटते की कोणीही असे करु नये. मी सहमत आहे की मीम्स तुमच्या विनोदासाठी असू शकतात, परंतु ते एखाद्याच्या जीवनाशी संबंधित आहेत. तुम्ही ते मीम्स खूप विचारपूर्वक बनवावेत.”

हेही वाचा – Harbhajan Singh : ‘आजकल क्या फूंक रहे हो…’, रिझवानची धोनीशी तुलना केल्याने हरभजन सिंगने पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले

‘दम असेल तर व्हेरिफाईड पेजवरून बोलून दाखवा’

मोहम्मद शमी पुढे म्हणाला, “आज तुम्ही व्हेरिफाईड पेज नाही, तुमचा पत्ता माहीत नाही, तुमची माहिती माहीत नाही, त्यामुळे तुम्ही काही बोलू शकता. या व्यासपीठावर मला एकच सांगायचे आहे की तुमच्यात दम असेल तर व्हेरिफाईड पेजवरून बोलून दाखवा. मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही किती पाण्यात उभे आहात.”

हेही वाचा – IND vs PAK : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नाने हरमनप्रीत कौर आश्चर्यचकित; म्हणाली, ‘हे माझं काम नाही…’, VIDEO व्हायरल

‘दुसऱ्याचा पाय खेचणे किंवा खड्ड्यात ढकलणे खूप सोपे’

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शमी पुढे म्हणाला, हे बघा दुसऱ्याचा पाय खेचण्याची वृत्ती किंवा दुसऱ्याला खड्ड्यात ढकलणे खूप सोपे आहे. थोडे यशस्वी होऊन पण दाखवा. तुमची पातळी थोडी वाढवा. तुमच्या कुटुंबाला तुमचा पाठिंबा दर्शवा. या चार लोकांचे भविष्य चांगले करा. जेवढं गैरवर्तन करुन दुसऱ्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न करता ना, तेवढं एखाद्याला मदत करून ही दाखवा. मग मी मान्य करेन की तुम्ही एक चांगली माणसे आहात.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you have guts mohammed shami breaks silence on sania mirza marriage rumours video viral vbm