शुक्रवारी डब्लिनमधील मालाहाइड येथे भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. आयर्लंडच्या १४० धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड मैदानात उतरले होते. ते खेळत असताना त्यांच्यात ताळमेळचा अभाव दिसून आला आणि एक मोठी घोडचूक झाली, पण यजमानांनी त्याच्यावर असे काही केले की त्याचे रूपांतर मजेशीर घटनेमध्ये झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूची आहे. जोशुवा लिटलच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने शॉर्ट फाइन लेगच्या दिशेने हलक्या हाताने फ्लिक करून शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी पळाला. दुसर्‍या बाजूला नॉन स्ट्रायकरला उभा असलेला ऋतुराज गायकवाड काही पावले चालल्यावर थांबला आणि यशस्वीला परत जाण्याचा इशारा केला. मात्र, यशस्वी जैस्वालचे गायकवाडच्या इशाऱ्याकडे लक्ष नव्हते. त्याने त्याची हाक ऐकली नाही आणि दुसऱ्या बाजूला क्रीझकडे धावत सुटला. भारताचे दोन्ही फलंदाज एकाच बाजूला होते.

हेही वाचा: IND vs IRE 1st T20: जसप्रीत बुमराहचे सामन्यानंतर पुनरागमनाबाबत सूचक विधान; म्हणाला, “माझं संघात येण्याचं स्वप्न…”

ऋतुराज गायकवाड थोडक्यात बचावला

ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल एकाच दिशेने धावत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. शॉर्ट फाइन लेगवरील क्षेत्ररक्षक चेंडू नॉन-स्ट्रायकर्सच्या दिशेने बॉल फेकतो. स्ट्रायकरच्या शेवटी एकही फलंदाज उपस्थित नसल्याने हेही अनाकलनीय होते. क्षेत्ररक्षकाचा थ्रो स्टंपच्या पुढे गेला आणि चेंडू मिड-ऑन क्षेत्ररक्षकाकडे पोहचला.

हेही वाचा: Rahkeem Cornwall: आरं भावा धावतोय की जॉगिंग करतोय? १४३ किलो वजनाच्या बलवान कॉर्नवॉलला असं रनआऊट केलं की… पाहा Video

ते पाहताच ऋतुराज गायकवाडने स्टंपकडे धाव घेतली. मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाने थ्रो फेकला आणि यष्टीरक्षक तो पकडण्यात अपयशी ठरला. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने डाइव टाकत क्रीजच्या आत प्रवेश केला. त्यामुळे भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही. हे पाहून आयरिश चाहत्यांनी डोक्याला हात मारून घेतला कारण, त्यांना आयर्लंडच्या खेळाडूंकडून अशा मूर्खपणाच्या कृत्याची अपेक्षा नव्हती.

भारताने सामना जिंकला

यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. क्रेग यंगने यशस्वी जैस्वालला पॉल स्टर्लिंगकरवी झेलबाद करून ही भागीदारी तोडली. यशस्वीने २३ चेंडूत २४ धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर यंगने तिलक वर्माला डगआऊटचा रस्ता दाखवला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर पाऊस आला आणि काही वेळाने पुढील खेळ रद्द करण्यात आला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने २ धावानी सामना जिंकला. कर्णधार जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind vs ire 1st t20 the lack of rapport between yashasvi jaiswal and ruturaj gaikwad and what the irish did on it was not expected avw