भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाचे खराब क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले. त्यामुळे माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने पाहुण्या संघाची खिल्ली उडवली आहे. जाफरने त्याच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने ABCD चा अर्थ नव्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या कसोटीत १७७ धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने क्षेत्ररक्षणादरम्यान अनेक झेल सोडले. ज्याचा फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला. रोहित शर्माचे शतक आणि रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्या. पहिल्या डावानंतर टीम इंडियाने कांगारूंवर २२३ धावांची आघाडी घेतली आहे.

वसीम जाफरने ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवतना, ट्विटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोला कॅप्शन देताना लिहले, ”ए फॉर ऑस्ट्रेलिया, बी फॉर बॉल, सी फॉर कॅच आणि डी फॉर ड्रॉफ.” माजी क्रिकेटपटूचे हे ट्विट व्हायरल होत आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघ नाणेफेकचा फायदा घेऊ शकला नाही. पाहुणा संग रवींद्र जडेजाच्या घातक गोलंदाजीमुळे १७७ धावांवर आटोपला. जडेजाने भारताकडून सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर मार्नस लाबुशेने सर्वाधिक ४९ धावा केल्या.

हेही वाचा – Women T20 WC: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘या’ प्रमुख खेळाडूच्या खेळण्याबाबत संभ्रम

भारतीय संघाचा पहिला डाव ४०० धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक १२० धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर रवींद्र जडेजाने ७० आणि अक्षर पटेलने ८४ धावा केल्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना टॉड मर्फीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात ७ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 1st test wasim jaffer mocked the australian team by tweeting vbm