IND vs AUS: Kangaroo taking help of his duplicate to deal with Ashwin Mahesh preparing Australian team | Loksatta

IND vs AUS: ‘जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी’ दिसे केवळ अश्विनची फिरकी! आव्हानाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने घेतली चक्क त्याच्याच डुप्लिकेटची मदत

ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना खेळण्याऐवजी बंगळुरूमध्ये सराव करण्याचा निर्णय घेतला आहे. इथे अश्विनचा डुप्लिकेट महेश पिठिया त्याला सराव करायला लावतोय.

IND vs AUS: Kangaroo taking help of his duplicate to deal with Ashwin Mahesh preparing Australian team
सौजन्य- (ट्विटर)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ आठवडाभर अगोदर भारतात आला होता. कांगारू संघ बेंगळुरूच्या फिरकी खेळपट्टीवर सराव करत आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी मोठा धोका बनू शकतात. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ फिरकी गोलंदाजांना खेळवण्यासाठी विशेष तयारी करत आहे.

रविचंद्रन अश्विन हा जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. विशेषत: भारतीय खेळपट्ट्यांमध्ये त्याचे आकडे उत्कृष्ट आहेत. अश्विनला सामोरे जाण्यासाठी कांगारू संघ विशेष तयारी करत आहे. अश्विनचा डुप्लिकेट गोलंदाज महेश पिठियाला बेंगळुरूला बोलावण्यात आले असून तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फिरकी गोलंदाजीचा सराव देत आहे. पिथियाची गोलंदाजी अश्विनच्या गोलंदाजीसारखीच आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेशची बॉलिंग अॅक्शन पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला बॉलिंगसाठी बंगळुरूला बोलावले आहे.

कांगारू फिरकी खेळपट्टीवर तयारी करत आहेत

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे म्हणणे आहे की, “सराव सामन्यांमध्ये बीसीसीआय त्यांना हिरव्या खेळपट्ट्या देते, ज्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत होत नाही आणि त्यांच्यासाठी फलंदाजी करणे सोपे होते, परंतु सामन्यांमध्ये फिरकी खेळपट्ट्या वापरल्या जातात. यामुळे त्याने या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ पूर्णपणे तुटलेल्या बेंगळुरूच्या जुन्या खेळपट्टीवर तयारी करत आहे. या तयारीमुळे त्यांना अश्विन आणि जडेजाचा कसोटी सामन्यात सामना करण्यास मदत होईल, अशी आशा ऑस्ट्रेलियाला असेल.”

हेही वाचा: Ramiz Raja: “भारताने पाकिस्तानी गोलंदाजी क्रिकेट मॉडेल केली नक्कल…” रमीझ राजाचे बेताल वक्तव्य

महेश कोण आहे

२१ वर्षीय महेशने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बडोद्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तरुण फिरकीपटू अश्विनला मानतो आणि एक दिवस त्याला भेटण्याची आकांक्षा बाळगतो. त्याला भारतासाठी अश्विनसारखी जादू करायला नक्कीच आवडेल, पण सध्या ऑस्ट्रेलियन संघाने त्याला सरावासाठी बोलावले आहे. यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. आगामी काळात तो कोणत्याही आयपीएल संघातही सहभागी होऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:03 IST
Next Story
धक्कादायक! दीपक चहरच्या पत्नीला लाखोंचा चुना लावत दिली जीवे मारण्याची धमकी; जाणून घ्या काय आहे प्रकरण