बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ज्यामध्ये भारताने यजमानांना २-० असे पराभूत केले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा अनुभवी अष्टपैलू आर अश्विन याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने पहिले गोलंदाजीत ६ विकेट्स घेतल्या, तर विजयाचा पाठालाग करताना महत्वपूर्ण नाबाद ४२ धावांची खेळी केली. सामन्यानंतर अश्विनची भारताची भक्कम बाजू सांभाळणारा चेतेश्वर पुजाराने मजेदार मुलाखत घेतली असून त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने स्वतः त्यांच्या ट्विटर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाज लवकर झटपट बाद झाले होते. तेव्हा ९व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या आर अश्विन याने अष्टपैलू कामगिरी करत सामन्याची दिशा बदलून टाकली. त्याने श्रेयस अय्यर याच्यासोबत मिळून अर्धशतकीय भागीदारी केली. मात्र, सामन्यात अशी एक वेळ आली जेव्हा ५ विकेट घेणाऱ्या मेहदी हसन याच्या फिरकीच्या जाळ्यात अश्विन फसला होता. तेव्हा अश्विनच्या लेग साईडला क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोमिनुल हक याच्या दिशेने त्याचा झेल गेला. मात्र, त्याच्या हातून तो चेंडू सटकला. त्यानंतर अश्विनने मागे वळून पाहिले नाही आणि ४२ धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सामन्यानंतरच्या पुजाराने घेतलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “मी माझ्या बचावाचे जोरदार समर्थन करतो. कसोटी क्रिकेट हे फलंदाज म्हणून बचावात्मक दृष्टीने खेळले जाते. आधुनिक क्रिकेट तुम्हाला हवेत फटके मारण्यास सांगते. जेव्हा दोन्ही गोलंदाज तुमच्यावर दबाव आणत असतात तेव्हा ते योग्य आहे असे मला वाटत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी त्या गोष्टीपासून पळू शकत नाही. त्यावेळची परिस्थिती पाहून खेळावे लागते असेच मला वाटते. जेव्हा दबाव नसतो तेव्हा काही वाटत नाही, पण जेव्हा तो दडपणाखाली असतो तेव्हा कसोटी सामन्यात बचावात्मक पद्धतीनेच खेळावे लागते. मी बरेच शॉट्स खेळले आहेत आणि ते योग्य प्रकारे सीमारेषा पार करतील असा मला आत्मविश्वास आहे. मी माझ्या बॅकलिफ्टवर, पॉवर हिटिंगवर आणि बेसवर खूप काम केले आहे. आणि आता मला माझ्यावर याबाबतीत विश्वास आहे,” अश्विनने बीसीसीआय टीवीवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आपला संघ सहकारी चेतेश्वर पुजाराला सांगितले.

हेही वाचा: AUS vs SA: ‘सांताक्लॉजचे गुड बॉयला गिफ्ट’, चेंडू स्टम्पला लागूनही नाबाद राहिलेल्या डीन एल्गरचा लियॉनला मजेशीर रिप्लाय पाहा video

अश्विन जेव्हा फलंदाजीसाठी बाहेर पडला तेव्हा भारताला अजूनही ७१ धावांची गरज होती आणि त्याचे पहिले लक्ष्य उपाहारापर्यंत पोहोचण्याचे होते. त्याने श्रेयस अय्यरचे मनापासून कौतुक केले. अश्विन पुढे म्हणाला की, “जेव्हा मी मैदानात उतरलो तेव्हा मला वाटले की आपल्याला या परिस्थितीचा सामना करावा लागेल. श्रेयस खरोखरच चांगला संयमी खेळाडू आहे आहे. मी त्याला फक्त काम पूर्ण करण्यास सांगितले मग ते १० षटकांत असो किंवा उपाहारानंतर. सुरुवातीला माझे उद्दिष्ट उपाहारापर्यंत खेळण्याचे होते. काही चेंडू विविध दिशांना टोलवले गेले. एक झेल फाईन लेगला गेला. त्यामुळे मला वाटले की आता आपला इरादा पुश अप करायला हवा आणि चांगला बचावही करायला हवा. आम्ही चांगला खेळ केला आणि योग्य वेळी वेग वाढवत लक्ष्यापर्यंत पोहोचलो.”

दुसरीकडे,  पुजाराने संपूर्ण मालिकेत जी आक्रमक खेळी करत विविध फटके मारले त्याबद्दल अश्विनने समाधान व्यक्त केले. भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पुजारा म्हणतो की, “पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात ज्या प्रकारे गोष्टी घडल्या त्याबद्दल मी खरोखरच खूश होतो. मी सराव करत असलेल्या शॉट्सचे प्रदर्शन करणे ही एक आदर्श परिस्थिती होती. यासाठी ससेक्स आणि सौराष्ट्रसाठी खेळलेल्या व्हाईट-बॉल क्रिकेटला बरेच श्रेय जाते, त्यामुळे मला मदत झाली. माझा आत्मविश्वास देखील वाढला.” शेवटी, अश्विनने सांगितले की, “९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर बॉर्डर-गावसकर मलिकेत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. काहीही करून तो चषक आम्हाला जिंकायचा आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban im happy with my performance as man of the match and man of the series express their feelings together watch video avw