R Ashwin dominates contest against Ben Stokes : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ७० धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात स्टोक्सला काही विशेष करता आले नाही. तो सहा धावा करून बाद झाला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने बाद केले. बुमराहने त्याला पहिल्या डावात क्लीन बोल्ड केले होते. त्याचबरोबर दुसऱ्या डावात अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत एक खास विक्रम केला. त्याने कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविचंद्रन आश्विनने दुसऱ्या डावात स्टोक्स बाद करताच कसोटीत एक अनोखा विक्रम रचला. अश्विनने त्याला बाराव्यांदा आपला बाद केले. या दिग्गज भारतीय फिरकी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर कसोटीत सर्वाधिक वेळा बाद होणारा स्टोक्स हा फलंदाज ठरला. या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्याही पुढे गेला. नुकतेच कसोटीतून निवृत्त झालेला माजी कांगारू सलामीवीराला अश्विनने कसोटीत ११ वेळा बाद केले आहे.

अश्विनने कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी केली –

कपिलने पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज मुदस्सर नजरला कसोटी क्रिकेटमध्ये १२ वेळा बाद केले होते. आता या खास यादीत अश्विनचाही समावेश झाला आहे. या प्रकरणात इशांत शर्माने ११ वेळा ॲलिस्टर कुकला तर कपिलने ११ वेळा ग्रॅहम गूचला बाद केले होते. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरलाही सर्वाधिक ११ वेळा बाद केले आहे. विशेष म्हणजे अश्विन हा एकमेव फिरकीपटू आहे.

अश्विनने नऊ वेळा ॲलिस्टर कुकला बाद केले –

अश्विनने इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकला कसोटी सामन्यात नऊ वेळा बाद केले. याशिवाय त्याने न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथम, ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि वेस्ट इंडिजचा सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट यांना प्रत्येकी आठ वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

हेही वाचा – IND vs ENG 1st Test : जो रुटने अवघ्या दोन धावा करत रचला इतिहास, भारताविरुद्ध केला सर्वात मोठा विक्रम

अश्विनविरुद्ध स्टोक्सची कामगिरी –

रवी चंद्रन अश्विनविरुद्ध बेन स्टोक्सची कामगिरी फारशी चांगली नाही. त्याने २५ डावात केवळ २३२ धावा केल्या आहेत. या काळात स्टोक्सची सरासरी १९.३३ आणि स्ट्राइक रेट ३७.२३ राहिली आहे. अश्विनने त्याला १२ वेळा बाद केले आहे. बेन स्टोक्सने भारताविरुद्ध आतापर्यंत १७ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत ३२ डावात ८४९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके आहेत. स्टोक्सची सरासरी २७.३८ आहे. भारतीय भूमीवर गेल्या १० डावांमध्ये स्टोक्सने ६, ७०, २, ५५, २५, ६, ८, १८, ७ आणि ८२ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे त्याने भारतात गेल्या १० डावांमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IND vs ENG 1st Test : ऑली पोपच्या शतकाने इंग्लंडचे सामन्यात दमदार पुनरागमन, दुसऱ्या डावात घेतली १२६ धावांची आघाडी

इंग्लंडकडे तिसऱ्या दिवसअखेर १२६ धावांची आघाडी –

भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या डावात भारतावर १२६ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून ३१६ धावा केल्या होत्या. उपकर्णधार ऑली पोपने जबरदस्त खेळी करत शतक झळकावले आणि नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो १४८ धावा करून नाबाद आहे. तर रेहान अहमद १६ धावा करून नाबाद आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 1st test r ashwin dominates contest against ben stokes dismisses batter 12th time in test cricket vbm