Ravichandran Ashwin 100 Test Wickets Against England : रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्ध एक खास शतक पूर्ण केले आहे. त्याने १०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या आहेत. अश्विनने रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध हा विशेष आकडा पूर्ण करत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध १०० कसोटी विकेट्स घेणारा अश्विन पहिला भारतीय गोलंदाज ठरला. याआधी, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या माध्यमातून भारतीय फिरकीपटूने ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा गाठला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले आहे. तुफानी फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला अश्विनने एलबीडब्ल्यू आऊट केले. तो ३५ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकारासह ३८ धावा करून बाद झाला. ही विकेट घेताच रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्ध आपल्या कसोटी विकेट्सचे शतक पूर्ण केले. अण्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनने इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत १०० विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत आतापर्यंत ११४ विकेट्स घेतल्या आहेत. ही आकडेवारी पाहता अश्विन ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी कसोटीत सरस आहे, असे म्हणता येईल.

आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला –

रविचंद्रन अश्विन हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये १००० हून अधिक धावा आणि १०० विकेट्सचा टप्पा गाठणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध १०८५ धावा केल्या असून १०० विकेट्स घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने आता कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या २३ कसोटी सामन्यांमध्ये १०० बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विनने भारताकडून ९९ कसोटी सामन्यांमध्ये ५०२ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये, रविचंद्रन अश्विनने ३४ वेळा पाच विकेट घेतल्या आहेत आणि ८ वेळा एका सामन्यात १० किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : इंग्लंडला मोठा धक्का! ‘या’ स्टार गोलंदाजाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून घेतली माघार

भारतासाठी ५०० कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज –

रविचंद्रन अश्विन हा भारताचा ५०० कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. भारतासाठी, माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे हा ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार करणारा पहिला गोलंदाज आहे. अश्विनने मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ५०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 4th test ravichandran ashwin became first indian bowler to take 100 test wickets against england vbm
First published on: 23-02-2024 at 12:42 IST