IND vs ENG Rohit Sharma surpasses Steve Smith : भारतीय कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म मागे राहिला आहे. कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माने शानदार शतक झळकावून विक्रमांची रांग लावली आहे. रोहितने केवळ ७६ चेंडूत षटकार मारून आपले शतक पूर्ण केले, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३२ वे शतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा रोहित जगातील तिसरा फलंदाज आहे. या दरम्यान रोहित शर्माने स्टीव्हन स्मिथला मागे टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील टॉप-३ मधील तिघेही भारतीय फलंदाज आहेत. विराट कोहली ५० शतकांसह अव्वल स्थानावर आहे तर सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, रोहित ३२ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ शतके झळकावली आहेत तर रोहितने ४९ शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज :

  • विराट कोहली – ५० शतके
  • सचिन तेंडुलकर – ४९ शतके
  • रोहित शर्मा – ३२ शतके
  • रिकी पॉन्टिंग – ३० शतके
  • सनथ जयसूर्या – २८ शतके

रोहित शर्माने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली. अशाप्रकारे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तिसरा सक्रिय खेळाडू ठरला. त्याने या बाबतीत स्टीव्हन स्मिथचा विक्रम मोडला. आता स्टीव्हन स्मिथ चौथ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू (सक्रिय खेळाडू) :

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng rohit sharma surpasses steve smith to become 3rd active player with most centuries in international cricket vbm