IND vs NZ 2nd T20: वॉशिंग्टनच्या धावबादवर सामन्यानंतर सूर्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला,'मी चेंडू ...' IND vs NZ 2nd T20 Suryakumar Yadav admits to the mistake of Washington Sundar being run out because of him | Loksatta

IND vs NZ 2nd T20: वॉशिंग्टनच्या धावबादवर सामन्यानंतर सूर्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला,’मी चेंडू …’

Washington Sundar Run Out: सूर्यकुमार यादवच्या चुकीमुळे वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला होता. सामना संपल्यानंतर स्काय म्हणाला की, चेंडू कुठे गेला होता हे माहीत नव्हते. तो धावबाद झाला ही माझी चूक होती. या सामन्यात सूर्याने २६ धावांची खेळी केली.

Washington Sundar Run Out
सूर्यकुमार यादव (फोटो- बीसीसीय ट्विटर)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ गडी राखून निसटता विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात वाशिंग्टन सुंदर धावबाद झाला होता, ज्यावर सूर्यकुमार यादवने सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

सूर्यकुमार यादवने चूक केली, ज्यामुळे न्यूझीलंडला विकेट मिळाली. पण सूर्याच्या एका चुकीमुळे वॉशिंग्टन सुंदरला धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदर धावबाद होण्यात त्याची चूक असल्याचे मान्यही केले.

वास्तविक, सूर्याने १५व्या षटकातील तिसरा चेंडू रिव्हर्स स्विप लगावण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅट आणि ग्लोव्हजला लागला आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला. सूर्यकुमार यादव धावा काढायला गेला. वॉशिंग्टन सुंदरने नकार दिला, पण सूर्य परत येऊ शकला नाही. अशा स्थितीत ब्लेअर टिकनरने चेंडू पकडला आणि स्टंपवर आदळला. याच कारणामुळे वॉशिंग्टन क्रीजबाहेर पडल्याने त्याला धावबाद व्हावे लागले. खरंतर वॉशिंग्टन सुंदरने सूर्यकुमार यादवला नाबाद ठेवण्यासाठी स्वत:च्या विकेटचा त्याग केला.

सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “स्कायची आज वेगळी आवृत्ती होती. जेव्हा मी फलंदाजीसाठी बाहेर पडलो, तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेणे खूप महत्त्वाचे होते. वॉशिंग्टन बाद झाल्यानंतर कोणत्याही एका फलंदाजाने शेवटपर्यंत खेळ राहणे महत्त्वाचे होते. वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला, तेव्हा ती माझी चूक होती. साहजिकच तिथे एकही धाव नव्हती, मी चेंडू कुठे जात आहे हे पाहिले नव्हते.”

हेही वाचा – IND vs NZ: भुवनेश्वरला मागे टाकत युझवेंद्र चहलचा नवा विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणार ठरला पहिलाच भारतीय

सूर्यकुमार पुढे म्हणाला, “ही एक आव्हानात्मक विकेट होती. आम्हाला दुसऱ्या डावात अशा प्रकारच्या वळणाची अपेक्षा नव्हती, पण जुळवून घेणे महत्त्वाचे होते. आम्हाला त्या षटकात फक्त एका फटक्याची गरज होती आणि आमचा संयम खूप महत्त्वाचा होता. विजयी धावा घेण्यापूर्वी, तो (हार्दिक) आला आणि मला म्हणाला ‘तू या चेंडूवर विजयी धाव घेणार आहेस’ आणि त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:06 IST
Next Story
Women U19 WC: ‘अंडर-१९ विश्वविजेता कर्णधार पृथ्वी शॉ ते शफाली वर्मा…,’ राहुल द्रविडने खास शब्दात दिल्या शुभेच्छा, Video व्हायरल