Asia Cup 2025 Final IND vs PAK: आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना खेळवला जात आहे. आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ प्रथमच फायनलमध्ये भिडणार आहेत. या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक झाली असून भारतीय संघाने जिंकली आहे. सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी स्टेडियमबाहेर दोन्ही संघांच्या चाहत्यांनी आपल्या संघाच्या बाजूने नारेबाजी केली. भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहते हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान भारतीय चाहत्यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी खास नारेबाजी केली आहे. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तानविरूद्ध सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. श्रीलंकाविरूद्ध अखेरच्या सुपर फोर सामन्यात हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे हार्दिक पंड्या अंतिम सामन्यात खेळणार नाहीये. त्याच्या जागी अतिरिक्त फलंदाज म्हणून रिंकू सिंहला संधी दिली आहे. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह परतला आहे.

भारतीय चाहत्यांनी सूर्यकुमार यादवला पाठिंबा देण्यासाठी एक खास ओळ लिहिली आहे. “२ रूपये का च्युंईगम सूर्याभाई सिंघम” अशी ही खास ओळ चाहते म्हणत आहेत. भारत-पाक सामन्यादरम्यान चाहते या वाक्यासह नारेबाजी करताना दिसणार आहेत.

पाकिस्तानविरूद्ध सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, फखर जमान, सईम अयूब, सलमान आघा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ, अब्रार अहमद