कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. या विजयासह भारताने 3 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली आहे. दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. 6 गडी राखून भारताने अखेरचा टी-20 सामना आपल्या खिशात घातला. विराटने सामन्यात नाबाद 61 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारताने सलामीवीर शिखर धवन – रोहित शर्माची अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. दिनेश कार्तिकने विराटला पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचायला मदत करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याआधी, फिरकीपटू कृणाल पांड्याने टिच्चून मारा करत अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 164 धावांवर रोखलं. कृणाल पांड्याने सामन्यात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिंच आणि डार्सी शॉर्टने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली.
मात्र कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडली. यानंतर अष्टपैलू कृणाल पांड्याने कांगारुंच्या उर्वरित फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. ठराविक अंतराने कृणालने कांगारुंच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ काहीसा अडचणीत सापडला. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी महत्वाच्या क्षणी करत संघाला महत्वाच्या धावा जमवून दिल्या. याचसोबत आज भारतीय क्षेत्ररक्षकांनी पुरती निराशा केली. अनेक सोपे फटके भारतीय क्षेत्ररक्षकांना अडवता आले नाहीत, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुरेपूर घेतला.
Highlights
कà¥à¤²à¤¦à¥€à¤ªà¤šà¥à¤¯à¤¾ गोलंदाजीवर मॅकà¥à¤¸à¤µà¥‡à¤²à¤²à¤¾ जीवदान
?????? ??? ?????????? ????? ????? ???????? ?????? ???????? ???? ??????? ????? ????. ????? ??????? ????????? ?????? ???????? ????? ???????? ???? ???. ?????????? ??????
अॅरोन फिंच - डारà¥à¤¸à¥€ शॉरà¥à¤Ÿ जोडीची अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•ी à¤à¤¾à¤—ीदारी
????-????? ?????? ??????? ????????? 68 ??????? ????????
नाणेफेक जिंकून ऑसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‡à¤²à¤¿à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¥à¤® फलंदाजी
??????? ?????? ????????????? ??????? ???? ???? ????? ????????? ?????? ????? ???.
विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत आपलं अर्धशतक झळकावलं आहे.
अँड्रू टायच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत यष्टीरक्षकाकडे झेल देत माघारी
मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल कुल्टर नाईलकडे झेल देऊन माघारी
दोन्ही फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी, भारताने ओलांडला 100 धावांचा टप्पा
अॅडम झॅम्पाच्या फिरकीवर रोहित शर्मा त्रिफळाचीत. भारताचा दुसरा गडी माघारी
मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का
रोहित-शिखरने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल करत 50 धावांचा टप्पा पार केला आहे.
भारताच्या एकाही जलदगती गोलंदाजाला आजच्या सामन्यात विकेट घेता आली नाही. कृणाल पांड्याने 4 तर कुलदीप यादवने सामन्यात 1 बळी घेतला. 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाची 164 धावांपर्यंत मजल
चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस लीन जसप्रीत बुमराहच्या फेकीवर धावबाद होऊन माघारी
मोठा फटका खेळण्याच्या नादात अॅलेक्स केरीने विराट कोहलीकडे झेल दिला
कृणाल पांड्या विरुद्ध ग्लेन मॅक्सवेल हे द्वंद्व या मालिकेत चांगलचं सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यात कृणालने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मॅक्सवेलला अडकवलं आहे.
बेन मॅक्डरमॉट कृणालच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी
रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना शॉर्ट पायचीत होऊन माघारी
फिंचला बाद केल्यानंतर त्याच षटकात मॅक्सवेल पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं. मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत मॅक्सवेल नाबाद असल्याचं समोर आलं. मॅक्सवेलला जीवदान
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फिंच पांड्याकडे झेल देत माघारी
फिंच-शॉर्ट जोडीची पहिल्ये विकेटसाठी 68 धावांची भागीदारी
कर्णधार आरोन फिंच आणि डी’आर्सी शॉर्ट यांनी केली डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाने बिनबाद १६ धावा केल्या. आरोन फिंच सात आणि डी’आर्सी शॉर्ट ६ धावांवर खेळत आहेत.
पहिल्या दोन टी२० सामन्यातील संघ भारताने कायम ठेवला आहे. संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर-बुमराह-खलील यांच्या खांद्यावर आहे. तर फिरकीची धुरा कुलदीप यादवकडे असणार आहे.
निर्णायक टी२० सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल स्टार्कला संधी देण्यात आली आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.