India Womens vs Bangladesh Womens Highlights: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. भारतीय संघाने गेल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. बांगलादेशविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना २७-२७ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला २७ षटकांअखेर ९ गडी बाद ११९ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२६ धावांची गरज आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय जोडीने दमदार सुरूवात करून दिली. स्मृती मान्धानाने नाबाद ३४ आणि अमनजोत कौरने १५ धावांची खेळी करून ८.४ षटकात भारतीय संघाची धावसंख्या ५७ धावांवर पोहोचवली. पण पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
पावसामुळे खेळ थांबला
पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे सामना थांबवण्यात आला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५७ धावा केल्या आहेत.
अरूंधती रेड्डीचा भन्नाट झेल! बांगलादेशचे ७ फलंदाज तंबूत
बांगलादेशला ७ वा धक्का बसला आहे. शर्मिन अख्तरला बाद करण्यासाठी अरूंधती रेड्डीने भन्नाट झेल घेतला आहे.
बांगलादेशचे ६ फलंदाज तंबूत
बांगलादेशचे ६ फलंदाज तंबूत परतले आहेत. नाहिदा अख्तर अवघ्या ३ धावा करत माघारी परतली आहे.
बांगलादेशचे निम्मा संघ तंबूत! टीम इंडिया मजबूत स्थितीत
बांगलादेशचे ५ फलंदाज तंबूत परतले आहेत. शोभना मोस्टारी बाद झाल्यानंतर शोर्ना अख्तर देखील बाद झाली आहे.
बांगलादेशला तिसरा धक्का! निगार सुलताना धावबाद होऊन परतली माघारी
बांगलादेशला तिसरा मोठा धक्का बसला आहे. संघाची कर्णधार निगार सुलताना धावबाद होऊन माघारी परतली आहे.
भारत- बांगलादेश सामना लवकरच सुरू होणार! किती षटकांचा खेळ होणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना ८ वाजून ५ मिनिटांनी सुरू होणार आहे. हा सामना २७-२७ षटकांचा असणार आहे.
पावसामुळे पुन्हा खेळ थांबला
पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना पुन्हा एकदा थांबवण्यात आला आहे.
बागंलादेशला दुसरा धक्का! हैदर झेलिक परतली माघारी
बांगलागेशला दुसरा धक्का बसला आहे. बागंलादेशला दुसरा धक्का! हैदर झेलिक स्वस्तात माघारी परतली आहे.
भारत- बांगलादेश सामना सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. हा सामना ५ वाजता सुरू होणार आहे. तर षटकं कमी करण्यात आली असून हा सामना ४३-४३ षटकांचा असणार आहे.
पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर
हा सामना नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सुरू आहे. पावसामुळे नाणेफेक उशिराने झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने सामना सुरू होण्यास देखील उशीर झाला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारतीय संघाची प्लेइंग ११: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरण, रेणुका सिंग ठाकूर.
बांगलादेशची प्लेइंग ११: सुमैय्या अख्तर, रुब्या हैदर झेलिक, शर्मिन अख्तर, शोभना मोस्टारी, निगार सुलताना (यष्टीरक्षक/कर्णधार), शोर्ना अख्तर, रितू मोनी, राबेया खान, नाहिदा अख्तर, निशिता अख्तर निशी, मारुफा अख्तर
