IND vs PAK Updates, Asia Cup 2023: शनिवारी (2सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. ती 48.5 षटकांत 266 धावांवर बाद झाली. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले..

Live Updates

Asia Cup 2023 Updates, IND vs PAK आशिया कप 2023 अपडेट्स, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच अपडेट्स:

17:58 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: इशान किशन आणि हार्दिक पांड्याने सांभाळला भारताचा मोर्चा

पाकिस्तानविरुद्ध भारताने 25 षटकांत 4 गडी गमावून 127 धावा केल्या आहेत. इशान किशन 43 आणि हार्दिक पंड्या 30 धावा करून नाबाद आहेत. दोघांनी 61 धावांची भागीदारी केली आहे.

17:54 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: इशान किशन आणि हार्दिक पंड्याने केले टीम इंडियाचे पुनरागमन

24 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 4 विकेटवर 121 धावा आहे. इशान किशन 45 चेंडूत 42 आणि हार्दिक पांड्या 29 चेंडूत 25 धावांवर खेळत आहे. दोघेही सहज धावा करत आहेत.

17:49 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: इशान किशन अर्धशतकाच्या जवळ

66 धावांत 4 विकेट पडल्यानंतर इशान किशनने टीम इंडियाचा डाव सावरला आहे. 23 षटकांनंतर 4 बाद 117 धावा. इशान किशन 41 आणि हार्दिक पांड्या 22 धावांवर खेळत आहे. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 5व्या विकेटसाठी 51 धावांची नाबाद भागीदारी केली आहे.

17:40 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: चौथ्या विकेटनंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशनची जमली जोडी

21 षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या 4 विकेटवर 108 धावा आहे. इशान किशन 37 आणि हार्दिक पांड्या 17 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 42 धावांची भागीदारी झाली आहे.

17:33 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: शादाब खानने 19व्या षटकात दिल्या अवघ्या 2 धावा

शादाब खानने 19व्या षटकात केवळ दोन धावा दिल्या. 19 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 94 धावा आहे. आता दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजी केली जात आहे.

17:28 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: हार्दिक पांड्या आणि इशान किशनची जमली जोडी

भारतीय संघाने १८ षटकांच्या समाप्तीनंतर ४ बाद ९२ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर हार्दिक पांड्या आणि इशान किशनची जोडी जमली आहे. इशान किशन २९ आणि हार्दिक पांड्या ९ धावांवर नाबाद आहे.

17:20 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: 16व्या षटकात आल्या 11 धावा

16व्या षटकात एकूण 11 धावा आल्या. शादाब खानच्या या षटकात इशान किशनने दोन चौकार मारले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली. 16 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 4 गडी बाद 83 झाली आहे. इशान किशन 23 आणि हार्दिक पांड्या 7 धावांवर खेळत आहे.

17:15 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: टीम इंडियाची पडली चौथी विकेट, हरिस रौफने शुबमन गिलला केले बोल्ड

टीम इंडियाने 15 व्या षटकात 66 धावांवर चौथी विकेट गमावली. शुबमन गिल 32 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलला हारिस रौफने बोल्ड केले.

17:05 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: हरिस रौफच्या चेंडूवर इशान किशनने ठोकला शानदार षटकार

12व्या षटकात इशान किशनने हरिस रौफच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. 12 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 58 धावा आहे. शुबमन गिल 7 आणि इशान किशन 8 धावांवर खेळत आहेत.

16:59 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: गुड न्यूज! पाऊस थांबल्याने कव्हर्स हटवले

भारत-पाक सामन्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅंडीमध्ये पाऊस थांबला आहे आणि खेळपट्टीवरील कव्हर्स काढण्यात आली आहेत. लवकरच पुन्हा एकदा सामना सुरू होईल.

16:44 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: भारत-पाक सामन्याला पावसाने पुन्हा आणला अडथळा, ११.२ षटकानंतर थांबला खेळ

पुन्हा एकदा पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. आतापर्यंत 11.2 षटके खेळली गेली आहेत. टीम इंडियाचा स्कोर 3 विकेटवर 51 धावा आहे. इशान किशन 2 आणि शुबमन गिल 6 धावांवर खेळत आहेत. आतापर्यंत रोहित शर्मा 11, विराट कोहली 4 आणि श्रेयस अय्यर 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

16:40 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: ११ व्या षटकांत टीम इंडिया पूर्ण केले अर्धशतक

11 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेटवर 51 धावा आहे. पाकिस्तानी गोलंदाज पेटले आहेत. शुभमन गिल 2 आणि इशान किशन 2 धावांवर खेळत आहेत. आतापर्यंत शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला गोलंदाजी केली आहे. तर हरिस रौफने श्रेयस अय्यरला झेलबाद केले.

16:32 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: टीम इंडियाने १०व्या षटकात गमावली तिसरी विकेट

भारताला 10व्या षटकात तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 9 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. हरिस रौफने अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आता पाचव्या क्रमांकावर इशान किशन फलंदाजीला आला आहे. आतापर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर बाद झाले आहेत.

16:27 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: अय्यरने आठव्या षटकात मारले दोन चौकार

हरिस रौफने आठवे षटक टाकले. या षटकात श्रेयस अय्यरने दोन चौकार मारले. या षटकात दोन दुहेरीही धावा आल्या. अशा प्रकारे, 8 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 2 विकेटवर 42 धावा आहे. अय्यर १३ आणि गिल एकावर धावांवर आहे.

16:23 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: श्रेयस अय्यरने केली उत्कृष्ट सुरुवात

दुखापतीमुळे श्रेयस अय्यर दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध चांगली सुरुवात केली आहे. त्याने पहिल्या ७ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा केल्या आहेत. हरिस रौफच्या पहिल्याच षटकात त्याने दोन्ही चौकार मारले.

16:19 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: ७ षटकांत भारताची धावसंख्या २ बाद ३० धावा

सात ओव्हर संपल्यानंतर टीम इंडियाची स्कोअर २ विकेटवर २० धावा आहेत. श्रेयस अय्यर १ आणि शुभमन गिल १ धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा ११ आणि विराट कोहली ४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. दोघेही शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाले.

16:11 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही बाद, शाहीन आफ्रिदीनी टीम इंडियाची उडवली दाणादाण

सातव्या षटकात टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. रोहित शर्मानंतर शाहीन आफ्रिदीनेही विराट कोहलीला बाद केले. किंग कोहलीला केवळ चार धावा करता आल्या. आता श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आला आहे.

16:03 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: भारताला बसला पहिला धक्का, रोहित शर्मा क्लीन बोल्ड

टीम इंडियाला पहिला धक्का 5 व्या षटकात बसला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला बोल्ड केले. रोहित फक्त चेंडू थांबवत होता, पण तो बोल्ड झाला. रोहितने 22 चेंडूत 11 धावा केल्या. त्याने 2 चौकार मारले. भारताची धावसंख्या एक बाद 15 धावा.

16:02 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: पाऊस थांबला, कव्हर काढले

पल्लेकेलेमध्ये पाऊस थांबला आहे. कव्हर काढले जात आहेत. अशा स्थितीत सामना लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे सामना अनेकदा विस्कळीत होऊ शकतो.

15:52 (IST) 2 Sep 2023
ND vs PAK: पावसाने व्यत्यय आणल्यास किती षटकांचा खेळ होणे आवश्यक? DLS नियम कधी लागू होणार, जाणून घ्या सर्व काही

वास्तविक, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निकालासाठी २०-२० षटकांचा खेळ होणे आवश्यक असते. कँडीमध्ये शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. Accuweather नुसार, १० मिमी पाऊस पडू शकतो. पावसाची शक्यता ५६ ते ७८ टक्के आहे. पाऊस अधूनमधून सुरू राहिल्यास डकवर्थ लुईस नियम लागू होऊ शकतो. पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ सुपर ४ साठी पात्र ठरेल, तर भारतीय संघाला सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी नेपाळला पराभूत करावे लागेल.

15:46 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: पाचव्या षटकांत अचानक सुरु झाला जोरदार पाऊस

पाचव्या षटकात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर खेळ थांबवावा लागला. खेळपट्टीवर कव्हर्स आले आहेत. आतापर्यंत ४.२ षटके खेळली गेली आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद १५ धावा आहे. रोहित शर्मा ११ आणि शुबमन गिल (०) धावांवर खेळत आहेत.

15:40 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे

रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंत दोन चौकार मारले आहेत. रोहित शर्मा १३ चेंडूत ११ धावा आणि शुबमन खाते न उघडता क्रीजवर आहे. टीम इंडियाची धावसंख्या ४.२ षटकात निबबाद बाद १५ धावा आहे. शाहीन आफ्रिदीने २ षटकात ११ धावा दिल्या आहेत. नसीम शाहने एका षटकात २ धावा दिल्या आहेत.

15:30 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! ४.२ षटकानंतर पावसामुळे खेळ थांबला

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात झाला आहे. खेळपट्टी झाकण्यात आली आहे. पाऊस येण्यापूर्वी भारताने 4.2 षटकांत कोणतेही नुकसान न करता 15 धावा केल्या होत्या. रोहित 11 धावा करून खेळत आहे तर शुबमन गिल अजून खाते उघडू शकलेला नाही.

15:26 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: चौथ्या षटकात फक्त एक धाव आली

नसीम शाहने चौथे षटक टाकले. या षटकात वाईड बॉलच्या रूपात एकच धाव आली. अशाप्रकारे, 4 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 15 धावा झाली आहे. शुभमन गिलने अद्याप खाते उघडलेले नाही. त्याने आठ चेंडू खेळले आहेत. रोहित शर्मा 2 चौकारांसह 11 धावांवर खेळत आहे.

15:25 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: 3 षटकांनंतर टीम इंडियाच्या बिनबाद 14 धावा

तीन षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न गमावता 14 धावा आहे. शाहीन आफ्रिदीच्या या षटकात रोहित शर्माने शानदार चौकार लगावला. रोहितचा हा दुसरा चौकार आहे. रोहित 11 धावांवर आला आहे. तर गिल यांनी अद्याप खाते उघडलेले नाही.

15:15 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्मा आणि शुबमन गिल देतायत सलामी

भारतीय संघाने दोन षटकानंतर १० धावा केल्या आहेत. खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि शुबमन गिल खेळत आहेत. आफ्रिदीने पहिल्या षटकात ६ धावा दिल्या तर नसीम शाहने दुसऱ्या आणि डावातील पहिल्या षटकात ३ धावा दिल्या.

15:05 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी देतील

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल भारताची सलामी देणार आहेत. टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी या दोन्ही खेळाडूंवर आहे. त्याला सुरुवातीच्या षटकांमध्ये शाहीन आफ्रिदीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

14:57 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: सामना खेळण्यासाठी उत्सुक; श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर शस्त्रक्रियेनंतर पहिला सामना खेळणार आहे. ब्रॉडकास्टरशी बोलताना अय्यर म्हणाला की, मैदानात परत आल्याने मला आनंद होत आहे. तो म्हणाला की मी सामना खेळण्यासाठी उत्सुक आहे. पाकिस्तान संघ एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर 1 संघ आहे. अशा परिस्थितीत आम्ही नियोजनानुसार खेळू..

14:52 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: विराट-रोहित जोडी इतिहास रचण्यापासून फक्त दोन पावले दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात करू शकते ‘हा’ मोठा कारनामा

IND vs PAK: विराट-रोहित जोडी इतिहास रचण्यापासून फक्त दोन पावले दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात करू शकते ‘हा’ कारनामा
14:49 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: आम्ही हवामानाचा विचार करत नाही; रोहित शर्मा

नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माला प्रथम फलंदाजी करण्याबाबत विचारले असता, तो म्हणाला की आम्ही हवामानाचा जास्त विचार करत नाही. स्पर्धेपूर्वी आमचा बंगळुरूमध्ये ६ दिवसांचे शिबिर चांगले होते. अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंना येथे चांगली कामगिरी करावीशी वाटते.

Asia Cup 2023 Updates, IND vs PAK आशिया कप 2023 अपडेट्स, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच अपडेट्स:

Asia Cup 2023, India vs Pakistan Updates: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सुपर-4 मध्ये भिडणार आहेत.