जागतिक क्रमवारीत आगेकूच करून किमान आशिया खंडात वर्चस्व गाजवण्याचे ध्येय भारतीय फुटबॉलने जोपासावे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. अडथळ्यांची शर्यत पार करत नूतनीकरण झालेल्या कूपरेज मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी पटेल बोलत होते. या कार्यक्रमाला आशियाई फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम अल-खलिफा उपस्थित होते. यावेळी फिफाचे पदाधिकारी, भारताचे माजी फुटबॉलपटू यांच्यासह फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. कूपरेजवर बसवण्यात आलेले कृत्रिम टर्फ फिफाच्या गोल प्रकल्पाचा भाग आहे.
‘‘लीग स्पर्धा आणि फिफा मान्यताप्राप्त फुटबॉल स्पर्धा एकाचवेळी आयोजित करण्यासाठी मान्यता मिळालेला भारत एकमेव देश आहे. फिफाने भारतीय फुटबॉलमध्ये स्वारस्य दाखवले असून, आपल्याकडे या खेळाचा विकास व्हावा यासाठी फिफा प्रयत्नशील आहे, असे पटेल यांनी सांगितले.’’
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2014 रोजी प्रकाशित
किमान आशियात वर्चस्व गाजवावे – पटेल
जागतिक क्रमवारीत आगेकूच करून किमान आशिया खंडात वर्चस्व गाजवण्याचे ध्येय भारतीय फुटबॉलने जोपासावे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.
First published on: 04-12-2014 at 04:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian football feeling the isl impact