बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टर जेरेमी लालरिन्नुगाने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये १४० किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९ वर्षांच्या जेरेमीने क्लीन अँड जर्क विभागात १६० किलो वजन उचलून एकूण ३०० किलो ग्रॅम वजन उचलले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. १६५ किलो वजन उचलण्याच्या अंतिम प्रयत्नाच्या शेवटी जेरेमीला दुखापत झाल्याने तो शेवटचा प्रयत्न पूर्ण करू शकला नाही. असे असूनही त्याला सुवर्णपदावर आपले नाव कोरण्यात त्याला यश आले. सामोआचा अनुभवी लिफ्टर वैपावा इओनेने एकत्रित २९३ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले, तर नायजेरियाच्या एडिडिओंग उमोफियाने २९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.

मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय जेरेमीचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे पहिलेच वर्ष आहे. त्याने२०१८मधील युवा ऑलिंपिक स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा – IND W Vs PAK W T20 Live in CWG 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान ‘सुपर संडे’ लढत; नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरा दिवस भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी गाजवला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्य पदकाची कमाई झाली. आज जेरेमीने सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यामुळे वेटलिंफ्टिंगमध्ये भारताच्या नावावर एकून पाच पदकांची नोंद झाली आहे. या पाच पदकांपैकी दोन पदकं मुलींनी तर तीन मुलांनी जिंकली आहेत. काल (३० जुलै) मीराबाई चानूने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian weightlifter jeremy lalrinnunga wins gold in mens 67kg final at cwg 2022 vkk