IPL 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने IPL 2019 मध्ये आतापर्यंत ११ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत धोनीचा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. धोनीच्या संघाने आतापर्यंत झालेल्या १२ हंगामांपैकी जवळपास साऱ्याच हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या याच नेतृत्वाच्या कौशल्यावर त्याने क्रिकेट जगतात आणि विशेषतः IPL मध्ये आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सनरायजर्स हैदराबादवर ६ गडी राखून मात केली.
या सामन्यानंतर समालोचक हर्षा भोगले याने धोनीशी संवाद साधला. यावेळी हर्षा भोगले यांनी सर्व चाहत्यांच्या मनात असलेला प्रश्न धोनीला विचारला. प्रत्येक सामन्यात धोनी आपल्या नेतृत्वाच्या बळावर आणि खेळीच्या जोरावर संघाला विजयश्री मिळवून देतो. केवळ याच हंगामात नव्हे तर IPL च्या जवळपास प्रत्येक हंगामात धोनीच्या चेन्नईने उत्तम कामगिरी केली आहे. धोनीच्या या रहस्यामागचं गुपित काय? असा प्रश्न हर्षा भोगले यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना धोनी म्हणाला की मी जर माझ्या यशाचं रहस्य आताच सांगितलं तर माझ्यावर पुढच्या सामन्यात किंवा पुढील हंगामात कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे हे रहस्य सध्या गुलदस्त्यातच राहिलेलं बरं, असं धोनी म्हणाला.
Will @msdhoni tell @bhogleharsha the secret to @ChennaiIPL‘s consistency, season after season #CSKvSRH pic.twitter.com/FMasdNUqzP
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2019
दरम्यान, सलामीवीर शेन वॉटसनचं आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर वॉटसनने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ९६ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने वॉटसनला यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. अवघ्या ४ धावांनी वॉटसनचं शतक हुकलं. या विजयासह चेन्नईने पुन्हा एकदा आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या १६ गुण जमा आहेत, त्यामुळे प्ले-ऑफच्या फेरीत दाखल होण्यासाठी चेन्नईचा संघ अवघी काही पावलं दूर आहे.
