मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या बाराव्या हंगामातली सुरुवात काही चांगली झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमध्ये मुंबईचा संघ केवळ एकदाच जिंकलेला आहे. दिल्ली आणि पंजाबविरुद्ध सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यातही पंचांनी मलिंगाच्या नो-बॉलकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुंबईच्या विजयाला वादाची किनार लाभली. शनिवारी मोहालीच्या मैदानातही मुंबईच्या पदरात पराभव पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पराभवासोबत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – Video : ऋषभ पंतचा हा भन्नाट झेल पाहिलात का??

दरम्यान, ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने घरच्या मैदानावर खेळत असताना, मुंबई इंडियन्सवर 8 गडी राखून मात केली. मुंबईने दिलेलं 177 धावांचं आव्हान पंजाबच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. पंजाबकडूल सलामीवीर लोकेश राहुलने अर्धशतक झळकावलं, त्याला मयांक आणि ख्रिस गेलने फटकेबाजी करत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – IPL 2019 : एका धावाने पृथ्वीचं शतक हुकलं आणि विक्रमाची सुवर्णसंधीही

पंजाबच्या फलंदाजांना सुरुवातीला धक्के देण्यात मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. गेल आणि राहुल जोडीने 53 धावांची भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर ख्रिस गेलला माघारी धाडण्यात कृणाल पांड्याला यश आलं. मात्र त्यानंतरही लोकेश राहुलने आधी मयांक अग्रवाल आणि नंतर डेव्हिड मिलरच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलने नाबाद 71 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 बळी घेतले. याव्यतिरीक्त एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 kxip vs mi rohit sharma fined for slow over rate