IPL 2020 Auction : IPL च्या आगामी हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात ३०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या लिलाव प्रक्रियेमध्ये परदेशी आणि त्यातही विशेषत: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा वरचष्मा राहिला. परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लागली. पंजाबच्या संघाने आपल्याकडे असलेली रक्कम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वापरली आणि चांगले खेळाडू ताफ्यात सामील करून घेतले. तसेच त्यांनी लोकेश राहुलला आपला कर्णधारही जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहूया लिलावानंतर पंजाबचा संपूर्ण संघ

फलंदाज – ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, करूण नायर, सर्फराज खान, मनदीप सिंग

गोलंदाज – शेल्डन कोट्रेल (८.५० कोटी), इशान पोरेल (२० लाख), रवी बिश्नोई (२ कोटी), मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्षदीप सिंग, हार्डस विलजोन, एम अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे

अष्टपैलू – ग्लेन मॅक्सवेल (१०.७५ कोटी), जिमी निशम (५० लाख), ख्रिस जॉर्डन (३ कोटी), तरजींदर ढिल्लन (२० लाख), कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा (५० लाख)

यष्टिरक्षक – लोकेश राहुल, निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंग (५५ लाख)

IPL लिलावात अशा लागल्या बोली

पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 0 0 auction kings xi punjab kxip team complete players list squad vjb 91