आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद असा सामना रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघाने ८ सामन्यात १२ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ७ सामन्यात २ गुण मिळवत गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. दिल्ली संघाने हैदराबादल या सामन्यात पराभूत केल्यास गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होणार आहे. दिल्लीचं नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे आहेत. तर हंगामाच्या मध्यातच सनरायझर्स हैदराबादने मोठा बदल करत डेव्हिड वॉर्नरला हटवून संघाने केन विलियमसनला कर्णधारपद दिले आहे. त्यामुळे आता केन विलियमसन संघाला तारणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर होता. आता त्याचं संघात पुनरागमन झालं आहे. श्रेयसमुळे दिल्लीची फलंदाजी आणखी मजबूत होणार आहे. दिल्लीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन चांगली सुरुवात करून देत आहेत. तर कर्णधार ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस आणि शिमॉन हेटमायर मधल्या फळीत आक्रमक खेळी करतात.

दुसरीकडे टी नटराजनने युएईत झालेल्या २०२० स्पर्धेत १६ गडी बाद केले होते. मात्र दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यात खेळला नव्हता. आता नटराजन फिट आहे आणि त्याच्या पुनरागमनामुळे हैदराबादच्या गोलंदाजीला धार मिळणार होती. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.. नटराजन नसला तरी भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा भेदक गोलंदाजी करतात. आयपीएल इतिहासात दिल्ली आणि हैदराबाद संघ १९ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ११ सामन्यात हैदराबादने विजय तर ७ सामन्यात दिल्ली विजयी झाली आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. दुबईत यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), शिम्रॉन हेटमायर किंवा स्टीव्ह स्मिथ, मारक्यूस स्टोईनिस, अक्षर पटेल, आर. अश्विन, अनरिच नोर्टजे, कसिगो रबाडा, अवेश खान
सनराईजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर, वृद्धीमान साहा, केन विलियमसन (कर्णधार), मनिष पांडे, विजय शंकर, अब्दुल समाद, मोहम्मद नबी, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 srh vs dc 22 september match preview rmt