IPL 2022 : ठरलं..! अहमदाबाद संघाकडून खेळणार हे ३ धुरंधर; हार्दिक पंड्या, राशिद खान आणि…

हार्दिक आणि राशिदला मिळणार प्रत्येकी ‘इतके’ कोटी!

IPL 2022 Ahmedabad franchise named Gujarat Titans
हार्दिक पंड्याच्या नव्या आयपीएल संघाचं नामकरण

आयपीएल २०२२ (IPL 2022) मेगा लिलावापूर्वी हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रेंचायझीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद हा आयपीएलचा नवा संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत त्यांनी हार्दिक, राशिद आणि शुबमन यांची निवड केली आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांना संघाने सोबत घेतले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोलंकीला संघ संचालक बनवण्यात आले आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीची मालकी CVC कॅपिटल पार्टनर्सकडे आहे.

ESPNcricinfoच्या बातमीनुसार, अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांना २२ जानेवारीपर्यंत त्यांच्या तीन कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत. अहमदाबादने हार्दिक आणि राशिदला प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शुबमन गिलला ७ कोटी रुपये मिळणार आहेत. हार्दिक पंड्या संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तो प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधार होणार आहे.

हेही वाचा – IPL 2022 पूर्वीच श्रेयस अय्यरला लागली लॉटरी; ‘या’ संघानं दिली CAPTAINCYची ऑफर!

हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. शुबमन गिल कोलकाता नाइट रायडर्सचा एक भाग होता आणि अफगाणिस्तानचा राशिद खान सनरायझर्स हैदराबाद संघात होता. हार्दिकला २०१५ मध्ये मुंबईने १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले होते. २०१८ मध्ये त्याला कायम ठेवण्यासाठी मुंबईने ११ कोटी रुपये खर्च केले.

यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे लिलाव होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 hardik pandya rashid khan and shubman gill set to join ahmedabad team adn

Next Story
Pro Kabaddi League : मोक्याच्या क्षणी यूपी योद्धानं मारली मुसंडी..! पुणेरी पलटणचा आणखी एक पराभव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी